NAFED Agrowon
ॲग्रो विशेष

NAFED Malpractice : गोपनीयतेच्या आडून ‘नाफेड’मधील गैरव्यवहार दाबण्याचा प्रयत्न?

Farmers Complaints : ‘नाफेड’कडून झालेल्या कांदा खरेदीमध्ये अनेक गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केल्या होत्या.

Team Agrowon

Nashik News : ‘नाफेड’कडून झालेल्या कांदा खरेदीमध्ये अनेक गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केल्या होत्या. त्यावर मंगळवारी (ता. १०) चौकशीसाठी आलेल्या ‘नाफेड’च्या तपासणी पथकापुढे तक्रारदारांची सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान झालेले इतिवृत्त न लिहिणे निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांना पोहोच न देणे असे प्रकार समोर आले. त्यामुळे गोपनीयतेच्या आडून ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची हकीकत खुद्द शेतकऱ्यांनीच ‘नाफेड’कडे बोलून दाखवली.

कातरणी (ता. येवला) येथील शेतकरी गोरख संत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ‘नाफेड’च्या खरेदीतील गैरव्यवहार संदर्भात तक्रार केली होती. त्याची गांभीर्याने दखल केंद्रीय सतर्कता आयोग व कृषी मंत्रालयाने घेतली. त्यानंतर ‘नाफेड’ला संदर्भात चौकशी करून तक्रार शेतकऱ्यांची सुनावणी घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. १०) पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात सुनावणी झाली. मात्र सुनावणीचे कुठलेही इतिवृत्त लिहिले गेले नव्हते. अखेर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत इतिवृत्त द्यावे. अन्यथा, कार्यालयीन सुनावणी झाली असे म्हणता येणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर अधिकारी नरमले.

‘‘आमच्याकडे मराठी टंकलेखन करणारा कुठलाही प्रतिनिधी नाही. आम्ही सर्व अधिकारी आहोत, कसे करणार,’’ असे सांगत सुरुवातीला अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. मात्र शेतकरी ठाम राहिल्याने नंतर ‘नाफेड’चे अधिकारी निखिल साखरे यांनी मराठीत एका कागदावर इतिवृत्त लिहून घेतले. मात्र त्याची पोचही देण्यात आली नव्हती. दुसऱ्यांदा शेतकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर शिक्का मारून पोहोच देण्यात आली, असे निवेदन देण्यासाठी गेलेले शेतकरी किरण सानप यांनी सांगितले.

आम्ही ‘नाफेड’कडे निवेदने देतो; मात्र त्याची पोहोच दिली जात नाही. आमचे पुरावे व निवेदने नष्ट करण्याचा प्रयत्न होतो, असाही संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘नाफेड’च्या कार्यालयीन कामकाजातही भोंगळ कारभार असल्याचे निवेदन देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ऑटिट रिपोर्ट देण्याची मागणी केली. मात्र, ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी ‘‘आम्ही माहिती अधिकाराच्या कार्यक्षेत येत नसल्याने देऊ शकत नाही,’’ असे सांगत अधिकाऱ्याने हात झटकले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT