Onion Procurement Malpractice : 'नाफेड'च्या कांदा खरेदी केंद्रावर गैरप्रकार उघडकीस  

NAFED Onion Procurement : शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याऐवजी बाजार समितीतूनच कांदा खरेदी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Onion Procurement
Onion ProcurementAgrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘नाफेड’चे नवनिर्वाचित अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी नाशिक जिल्ह्यातील काही कांदा खरेदी केंद्रांवर अचानक भेटी दिल्या. या वेळी काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याऐवजी बाजार समितीतूनच कांदा खरेदी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे ‘नाफेड’च्या खरेदीत भ्रष्टाचाराचे धागेदोरे सापडण्याची दाट शक्यता आहे.
बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या कांदा दराच्या तुलनेत ‘नाफेड'कडून खरेदी होणाऱ्या कांद्याचे दर स्पर्धात्मक नाहीत. यासह खरेदीत गोंधळ असून भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार आहिर यांनी ही कांदा खरेदी केंद्रांवर अचानक भेटी दिल्या.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत पाच लाख क्विंटल खरेदी चालू वर्षी होणार आहे. त्यापैकी अडीच लाख टन कांदा खरेदी ‘नाफेड’कडून सुरू आहे. मात्र त्यात ९० टक्के खरेदी ही नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित आहे.

एकीकडे खरेदीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच अहीर यांनी जिल्ह्यातील सटाणा, वासोळ, देवळा, चांदवड या खरेदी केंद्रांवर भेटी दिल्यानंतर खरेदी प्रक्रियेतील अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ, खरेदी केंद्र व काही ‘नाफेड’चे अधिकारी यात सापडण्याची दाट शक्यता आहे, असे सूत्रांकडून समजते.

Onion Procurement
Onion Procurement : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ करणार पाच लाख टन कांदा खरेदी

‘नाफेड’च्या धोरणानुसार कांदा खरेदीत शेतकऱ्यांची निवड, प्रत्यक्ष खरेदी करताना मालाची प्रतवारी तपासून खरेदी होणे अपेक्षित आहे.

मात्र त्यास खरेदी केंद्रांवर हरताळ फासल्याचे कामकाजातून दिसून आले आहे. खरेदी धोरण व निकष न पाळता कामकाज होत आहे. या सर्व गैरव्यवहारासंबंधी प्रकारांच्या नोंदी श्री. अहीर यांनी घेतल्या आहेत.

आढळलेले गैरप्रकार :

केवळ आधारकार्डवर शिक्के मारुन ऑनलाइन खरेदी
नोंदवलेल्या खरेदीच्या तुलनेत केंद्रांवर दुपटीहून अधिक कांद्याची साठवणूक
शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळत नसून मध्यस्थी पैसे कमवीत आहेत
शेतकऱ्यांच्या खात्यातही पैसे जात नसून, दलाली झाल्याचे समोर

Onion Procurement
Onion Rate : ‘केंद्रा’कडून आठ जिल्ह्यांत कांदा खरेदीचे वेगवेगळे दर !

केंद्रांवर होणार कडक कारवाई

दिल्लीला जाताच यासंबंधी चौकशी समिती स्थापन केली जाईल. ही समिती नाशिक जिल्हा दौऱ्यावर पाठवणार असल्याचेही श्री. अहीर यांनी सांगितले. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाच्या खरेदी केंद्रांवर गैरप्रकार समोर येईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

चुकीचे काम सुरू असल्याने ते संपुष्टात आणण्यासाठी भेटी दिल्या आहेत. स्वच्छ, पारदर्शक कामकाज करताना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, यासाठी प्रयत्नशील आहोत. कष्ट करून कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे.
जेठाभाई अहीर, अध्यक्ष, नाफेड
शेतकऱ्यांच्या मनात ‘नाफेड’बद्दल जो दुराग्रह आहे, तो मिटविण्यासाठी काम करत आहोत. कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. खरेदीत पारदर्शकता आणण्यासाठी ‘ॲक्शन मोड’वर आलो आहोत.
केदा आहेर, संचालक, नाफेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com