UPSC Success Story Agrowon
ॲग्रो विशेष

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

UPSC Result 2024 : अश्पाकचे माध्यमिक शिक्षण देवडी येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण नेताजी ज्युनिअर सायन्स कॉलेज, मोहोळ येथून पूर्ण केले. अ

Team Agrowon

Solapur News : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालात देवडी (ता. मोहोळ) येथील अश्पाक मुलाणी यांची कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय विभाग, दिल्ली येथील गंभीर फसवणूक तपास कार्यालयात सहायक संचालक (एसएफआयओ) म्हणून देशात सातव्या क्रमांकाने निवड झाली आहे.

या निकालात या पदावर विराजमान होणारा महाराष्ट्रातून तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. अश्पाकचे माध्यमिक शिक्षण देवडी येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे.

त्यानंतर त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण नेताजी ज्युनिअर सायन्स कॉलेज, मोहोळ येथून पूर्ण केले. अश्पाक यांच्या वडिलांना घरच्या शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे.

अश्पाक यांचे आजोबा रसूल मुलाणी यांना आपल्या नातवाने परंपरागत मटण विक्रीचा व्यवसायात न करता उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावे असे वाटायचे. त्यासाठी ते कायम अश्‍पाक यांना शिक्षणाचे महत्त्व सांगत असत. देवडी गावातील सामान्य कुटुंबातील अश्पाकने यूपीएससी परीक्षेत देशपातळीवर सातवा क्रमांक घेत ‘एसएफआयओ’ या पदी विराजमान होऊन यशाला गवसणी घातली आहे.

माझे शिक्षण ग्रामीण भागात मराठी माध्यमातून झाले आहे. पुण्यात आएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आल्यानंतर स्पर्धा परीक्षेत असलेल्या संधींबाबत माहिती मिळाली. या नवीन प्रवासात ॲड. गणेश शिरसाट यांचे मार्गदर्शन मिळत गेले. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच यश मिळते, या जाणीवेतून कुटुंबीयांच्या साथीने यश मिळविले.
- अश्पाक मुलाणी, देवडी, ता. मोहोळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT