UPSC Update : गडचिरोलीतील ‘बीडीओ’ ‘यूपीएससीत’ही चमकले

Abhijit Pakhare : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वतःहून गडचिरोली जिल्ह्यात पोस्टिंग घेणारे गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी ‘यूपीएससी’तही यशाचे शिखर गाठले आहे.
Abhijit Pakhare
Abhijit PakhareAgrowon

Gadchiroli News : एरवी नक्षलग्रस्त, अतिमागास गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणे, असाच गैरसमज अधिकारी वर्गात आहे. तो खोटा ठरवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वतःहून गडचिरोली जिल्ह्यात पोस्टिंग घेणारे गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी ‘यूपीएससी’तही यशाचे शिखर गाठले आहे.

Abhijit Pakhare
Water Stock : नायगावच्या तलावात ३५ टक्केच साठा

महाराष्ट्र लोकसेवआयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवेची संधी मागितल्याने गटविकास अधिकारी अभिजित पाखरे सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय झाले होते. आता त्यांनी यूपीएससीतही यश प्राप्त केले आहे.

विशेष म्हणजे, पाखरे यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केले. मात्र ही माहिती त्यांना मिळाली तेव्हा ते अहेरीत निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावत होते. अभिजित गहिनीनाथ पाखरे हे मूळचे बिड जिल्ह्यातील पाडळी तालुक्यातील शिरूर कासार गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे आई- वडील शिक्षक आहेत.

Abhijit Pakhare
Lemon Rate : आवक घटल्याने लिंबाची दरवाढ

त्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची पहिली नियमित नियुक्ती होणार होती.

अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेची सुरवात करण्याच्या हेतूने त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोली जिल्ह्यातच पोस्टिंग देण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमण्यात आले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com