Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : भूजल पातळी खोल चालल्याने पाण्याचे पुनर्भरण आवश्यक

Groundwater Level : मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील जलजीवन मिशन अंतर्गत रिचार्ज शाफ्ट केलेल्या सात कामांची पाहणी प्रधान सचिव खंदारे यांनी केली.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे समाधान कारक आहेत. या कामांना गती द्या, भूजल पातळी खोल जात असलेने पाण्याचे पुनर्भरण करा, असे आवाहन राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील जलजीवन मिशन अंतर्गत रिचार्ज शाफ्ट केलेल्या सात कामांची पाहणी प्रधान सचिव खंदारे यांनी केली.

याप्रसंगी भूजल सर्वेक्षण विभागाचे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, उप अभियंता वसीम शेख, कनिष्ठ भूवैज्ञानिक अनिता बनसोडे उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील सारोळे हा भाग टंचाई क्षेत्रात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर सारोळे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पुनर्भरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कामामुळे स्रोत बळकटीस मदत होत आहे. या विशेष कामांची पाहणी प्रधान सचिव खंदारे यांनी केली.

तत्पूर्वी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी खंदारे यांचे स्वागत केले. या प्रसंगी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT