Water Crisis : माळशिरसच्या पश्‍चिम भागात बावीस गावांत पाण्याचे दुर्भिक्ष

Water Scarcity : तालुक्यातील पश्चिम भागातील दक्षिण दिशेला असणारे फडतरी हे गाव दुष्काळी तर आहेच, परंतु पिण्याच्या पाण्याचेही मोठे दुर्भिक्ष आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Solapur News : माळशिरस तालुका म्हटले, की सहकाराचे नंदनवन, समृद्ध तालुका, अशी ओळख असली, तरीही नीरा उजवा कालव्याच्या लाभापासून वंचित असणाऱ्या २२ गावांची परवड स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही सुरूच आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील दक्षिण दिशेला असणारे फडतरी हे गाव दुष्काळी तर आहेच, परंतु पिण्याच्या पाण्याचेही मोठे दुर्भिक्ष आहे.

वर शिखर शिंगणापूरचा डोंगर, लगत गुप्तलिंगचे तीर्थक्षेत्र, डोळ्यासमोरून वाहणारा नीरा उजवा कालवा आहे; परंतु पाण्यापासून वंचित असणारा हा परिसर आपली शेती पिकवू शकत नाही. जनावरांना आणि स्वतःलाही पिण्याचे पाणी नसल्यामुळे जगू शकत नाही, अशी अवघड परिस्थिती या भागाची आहे.

Water Scarcity
Water Crisis : टँकरच्या मागणीची यादी तत्काळ प्रशासनाकडे पाठवा

सध्या फडतरी गावची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार असून, मतदार चार हजार आहेत. या गावांतर्गत चार वाड्या आणि २२ वस्त्या आहेत. महसुली क्षेत्र सुमारे चार हजार हेक्टर असून, दीड हजार क्षेत्रावर ज्वारी, बाजरी यांसारखी पिके होतात. गावाची लांबी आठ किलोमीटर आणि रुंदी सहा किलोमीटर आहे.

Water Scarcity
Water Scarcity : केंदूर, पाबळमध्ये भीषण पाणीटंचाई

या तीन गावांत मिळून सुमारे चार हजार पशुधन आहे. यंदा पाऊसमान अतिशय कमी झाल्यामुळे विहिरी, ओढे व पाझर तलावांना अजिबात पाणी नाही. शेतात उभी पिके नाहीत. एखाद्या शेतकऱ्याची अपवाद वगळता संपूर्ण शेती ओसाड आहे.

टँकरने पाणी देताना पशुधनाचाही व्हावा विचार

तीन टँकरद्वारे गावाला पाच खेपा होतात. एका टँकरची क्षमता १२ हजार लिटर असून ६० हजार लिटर पाणी येत आहे. राज्य शासनाने फक्त लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे टँकर दिलेले आहेत; परंतु आमच्या गावात सुमारे चार हजार पशुधन असून त्यांना किमान प्रत्येकी ५० लिटर पाण्याची गरज आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. २० खेपा होणे गरजेचे आहे. अन्यथा पशुधन पाण्याअभावी तडफडून मरेल, अशी भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com