Moong and Urad  Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Urad Rate : मूग, उडदाची बाजारात आवक होताच दरात घसरण

Market Update : खरीप हंगामातील मूग, उडदाची स्थिती यंदा बरी आहे. काढणी करून बाजारात मूग, उडदाची आवक सुरू होताच दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत मूग, उडदाचे दर पाडलेले दिसत आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : खरीप हंगामातील मूग, उडदाची स्थिती यंदा बरी आहे. काढणी करून बाजारात मूग, उडदाची आवक सुरू होताच दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत मूग, उडदाचे दर पाडलेले दिसत आहेत.

तीन महिन्यांपूर्वी १० हजारांपासून ११,५०० रुपये क्विंटलने विकला जाणाऱ्या मुगाला सध्या ६ हजार ते ८,३०० रुपये तर ७,००० ते १० हजारांपर्यंत प्रतिक्विंटलने विकल्या जाणाऱ्या उडदाला ६ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटर दर मिळत आहे.

राज्यात मुगाचे नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात तर उडदाचे जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांत बऱ्यापैका उत्पादन घेतले जाते. यंदा उडदाचे नगर, सोलापूर, बीड जिल्ह्यात बऱ्यापैकी क्षेत्र आहे.

मुगाचे सरासरी ३ लाख ९३ हजार ९५० हेक्टर क्षेत्र असून यंदा २ लाख ३५ हजार ७०५ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सर्वच भागांत चांगला पाऊस असल्याने गेल्या वर्षीपेक्षा यंदा राज्यात मुगाचे ५३ हजार हेक्टर तर उडदाच्या क्षेत्रात १ लाख ३२ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा लवकर पेरणी झाल्याने काढणीही लवकर झाली.

गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात मूग, उडदाची आवक सुरू झाली. नगर येथील बाजार समितीत नगरसह राज्याच्या विविध भागांतून मूग, उडदाची आवक होते. सध्या नगरला दररोज मुगाची १५०० ते १७०० क्विंटल तर उडदाची १०० ते २५० क्विंटल आवक होत आहे.

नगरसह राज्यातील सर्वच बाजार समितीत मुगाची आवक होत असून आवक सुरू होताच पंधरा दिवसांपासून दर साधारण दोन ते अडीच हजारांनी खाली आले आहेत. मूग, उडदाचे यंदा साधारणपणे हेक्टरी दहा ते बारा क्विंटलचे उत्पादन निघत आहे. त्यानुसार राज्यात यंदा मुगाचे अडीच लाख टनांपेक्षा अधिक तर उडदाचे चार लाख टनांपेक्षा अधिक उत्पादनाचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT