Agriculture Sowing : परभणी, हिंगोलीत तूर, मूग, उडदाच्या पेरणीत घट

Kharif Season : या वर्षीच्या खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख नगदी पिकांना अधिक पसंती आहे. परिणामी, यंदाही तूर, मूग, उडीद या कडधान्यांच्या पेऱ्यात घट झाली आहे.
Agriculture Sowing
Agriculture Sowing Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : या वर्षीच्या खरीप हंगामात परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख नगदी पिकांना अधिक पसंती आहे. परिणामी, यंदाही तूर, मूग, उडीद या कडधान्यांच्या पेऱ्यात घट झाली आहे. शुक्रवार (ता. १९)पर्यंत एकूण कडधान्यांची ७९ हजार २४ हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे. त्यात परभणी जिल्ह्यात ८२ हजार ३७५ पैकी ३७ हजार ४२ हेक्टर (४४.९७ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात ५८ हजार ९९३ पैकी ४१ हजार ९८२ हेक्टर (७१.१६ टक्के) पेरणीचा समावेश आहे. सहा तालुक्यातील कडधान्यांचा पेरा ५० टक्केच्या आहे.

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार शुक्रवार (ता. १९)पर्यंत परभणी जिल्ह्यात ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ७९ हजार ९ हेक्टरवर (८९.५५) टक्के पेरणी झाली. कडधान्यांमध्ये तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ३० हजार ७७८ हेक्टर (६६.९७ टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी ४ हजार ८६४ हेक्टर (१७.९०टक्के), उडदाची ९ हजार ८० पैकी १ हजार ३६३ हेक्टरवर (१५.०२ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी ९६८ हेक्टर (१३.२१ टक्के), बाजरीची १ हजार १६७ पैकी १९० हेक्टर (१६.२७ टक्के),

Agriculture Sowing
Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात खरिपाचा पेरा अंतिम टप्प्यात

मक्याची १ हजार ३ पैकी ६०५ हेक्टर (६०.२५ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी २ लाख ४७ हजार ३४५ हेक्टरवर (९९.०५ टक्के), तिळाची १४० हेक्टर, कारळची २४ हेक्टर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ९२ हजार ६९२ पैकी १ लाख ९२ हजार ६९२ हेक्टर लागवड झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख २३ हजार ६८८ हेक्टरवर (८९.६५ टक्के) पेरणी झाली.

Agriculture Sowing
Tur Sowing : नगर जिल्ह्यात यंदा तुरीची सरासरीच्या दुप्पट पेरणी

कडधान्यांमध्ये तुरीची ४५ हजार ३०६ पैकी ३३ हजार ६४३ हेक्टर (७४.२६ टक्के), मुगाची ७ हजार ७८१ पैकी ४ हजार ७६८ हेक्टर (६१.२७ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी ३ हजार ४८९ हेक्टर (५९.३५ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ५ हजार ५०५ पैकी २ हजार ५३२ हेक्टर (४५.९९ टक्के), बाजरीची ५.३३ हेक्टर, मक्याची १ हजार २१८ पैकी ४५३ हेक्टर पेरणी झाली आहे. सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ४४ हजा हेक्टर, तिळाची ३२ हेक्टर, कारळाची ४ हेक्टरवर पेरणी झाली.

परभणी, हिंगोली एकूण कडधान्ये पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार, (ता. १९ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी १४८०० ५८२० ३९.३३

जिंतूर २०६२ ५७९४ २८.८८

सेलू ११२९८ ३८४७ ३४.०५

मानवत ६३२३ २८०३ ४४.३२

पाथरी ६५६५ ३७७५ ५७.४९

सोनपेठ ३४७२ २३३१ ६७.१३

गंगाखेड ७१४६ ५६०४ ७८.४२

पालम ५९८५ ४७५१ ७९.३८

पूर्णा ६६३६ ३०९० ४६.५६

हिंगोली ११३३४ ९४२३ ८३.१४

कळमनुरी १८४११ १६२७२ ८८.३८

वसमत ११२९८ ३८४७ ३४.०५

औंढानागनाथ ११०९७ ८५९० ७७.४१

सेनगाव १८४११ १६२७२ ८८.०५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com