Crop Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Harvesting : पावसाच्या उघडिपीने खरिपाच्या सुगीला गती

Kharif Crop : जिल्ह्यात खरिपाची २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या महिन्यापासून आगाप पेरणी केलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांची काढणी सुरू झाली होती.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील लांबणीवर गेलेल्या पिकांची काढणी आणि मळणीला पुन्हा गती आली आहे. सोयाबीन, भुईमूग, उडीद, यासह अन्य पिकांच्या काढणीत शेतकरी गुंतला असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरिपाची २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या महिन्यापासून आगाप पेरणी केलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांची काढणी सुरू झाली होती. ऑगस्टअखेर पाऊस झाल्याने पिकांची काढणी व मळणी लांबली होती. त्यातूनही खरिपातील पिकांच्या काढणीचे नियोजन शेतकरी करू लागला होता. हळू हळू काढणीची लगबग वाढू लागली होती.

मात्र, जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते. यामुळे खरिपातील काढणीला ब्रेक लागला होता. शेतकरी वाफसा येण्याची प्रतीक्षा करत होता. परिणामी सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग या पिकांसह अन्य पिकांची काढणी लांबणीवर पडली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या आठवड्यापासून शेतातील कामे व सुगीला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, एकाच वेळी काढणी सुरू झाल्याने काही प्रमाणात मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतकरी पिकांच्या काढणीचे नियोजन करू लागला असल्याचे चित्र शिवारात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT