Watermelon Harvesting : कलिंगड आले काढणीवर, पावसाने पिकाचे नुकसान

Watermelon Production : कलिंगडाची लागवड खरिपात फारशी झाली नाही. सुमारे १५० हेक्टरवर कलिंगड पीक होते. मागील हंगामात पिकात रोगराई आल्याने अतोनात हानी झाली.
Watermelon Harveting
Watermelon HarvetingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सध्या कलिंगड काढणीवर आहे. परंतु पावसाने पीकहानी झाली असून, आवक अल्प आहे. आवक कमी असल्याने दर टिकून असून, प्रतिकिलो २० ते२२ रुपये दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे.

कलिंगडाची लागवड खरिपात फारशी झाली नाही. सुमारे १५० हेक्टरवर कलिंगड पीक होते. मागील हंगामात पिकात रोगराई आल्याने अतोनात हानी झाली. एक ते दीड महिन्याचे पीक ऐन फळे लगडल्याच्या काळात हातचे गेले.

Watermelon Harveting
Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू; खरबूज लागवड अल्प

कलिंगडाचा एकरी खर्च ६५ ते ७० हजार रुपये आहे. एवढा खर्च अनेकांचा वाया गेला. यामुळे अनेकांनी यंदा लागवड टाळली आहे. सतत दोन-तीन वर्षे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा लागवड टाळली आहे. तर काही नवख्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

Watermelon Harveting
Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

यंदा जुलै व ऑगस्टमध्ये खरिपातील लागवड झाली नाही. यामुळे या महिन्यात आवक कमी आहे. मागील महिन्याच्या अखेरीस काहींची लागवड झाली आहे. परंतु ही लागवडदेखील कमी असून, पुढेही फारशी आवक राहणार नाही.

मागील वर्षी सुमारे १७० हेक्टरवर खानदेशात कलिंगडाची लागवड झाली होती. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील तळोदा व शहादा तालुका आघाडीवर होता. यंदा मात्र सर्वत्र लागवड घटली आहे.

अनेकांनी सणासुदीच्या काळातील मागणी लक्षात घेऊन जुलै महिन्यात लागवड केली आहे. कमाल शेतकऱ्यांनी रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून घेऊन लागवड पूर्ण केली आहे. तर काहींनी थेट बियांची टोकन पद्धतीने लागवड केली आहे.

पीक फळे पक्व होत आहेत. तर काही भागात काढणी सुरू आहे. ज्यांनी रोपांची लागवड मागील महिन्यात केली होती, त्या शेतकऱ्यांच्या पिकात पुढे काढणी सुरू होईल, असे दिसत आहे. पण पाऊस थांबल्यास पीक वाढ होईल व फळेही जोमात येतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com