Artificial Intelligence Agrowon
ॲग्रो विशेष

Ai in Farming: काटेकोर व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

Smart Farming: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने शेतकरी आणि पशुपालकांसाठी कार्यक्षम व पर्यावरणपूरक पद्धतींना चालना दिली आहे. ड्रोन्स, सेन्सर्स आणि रोबोटिक्सच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, पाणी आणि खतांचा योग्य वापर तसेच पशुपालनातील सुधारणा करता येतात.

Team Agrowon

डॉ. सोनम काळे, डॉ. योगेश पाटील

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ड्रोन, सेन्सर्स, आणि उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे जमिनीतील ओलावा, हवामान अंदाज, पिकांतील वाढ इत्यादी बाबी विश्लेषित करते. ड्रोन्स आणि उपग्रहांद्वारे शेतीचा सविस्तर नकाशा, पिकांच्या वाढीवर नजर ठेवण्यासाठी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञान वापरले जाते.

जगभरात अन्नधान्याची मागणी वाढत असून त्याबरोबर पिकांची उत्पादकता वाढवणे, पाण्याचा कमी वापर करणे तसेच सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे झाले आहे.  शेती क्षेत्रात पाण्याचा योग्य वापर  महत्त्वाचा ठरतो. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे शक्य आहे. यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय ५० टक्यांपेक्षा  कमी करता येतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ड्रोन, सेन्सर्स, आणि उपग्रहांद्वारे मिळालेला माहितीच्या आधारे जमिनीतील ओलावा, हवामान अंदाज, पिकांतील वाढ इत्यादी बाबी विश्लेषित करते. ड्रोन्स आणि उपग्रहांद्वारे शेतीचा सविस्तर नकाशा, पिकांच्या वाढीवर नजर ठेवण्यासाठी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञान वापरले जाते. पाणी, खत आणि कीटकनाशकांचा अचूक वापर आणि व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञांचा वापर योग्य ठरतो.

सेन्सरच्या माध्यमातून जमिनीतील ओलाव्याचे विश्लेषण करून पाण्याचा वापर ५० टक्यांपेक्षा कमी करणे शक्य आहे.प्रतिमा विश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून  पानांवरील डाग, रोग किडींचा प्रादुर्भाव, पोषक तत्त्वांची कमतरता अचूकपणे ओळखता येते. कॅमेराचा वापर करून पिकाच्या पानावरील आलेला रोगाची अचूक ओळख करता येते. 

कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि  रोबोटिक्सच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने अचूक आणि पर्यावरणपूरक तण नियंत्रण करणे शक्य झाले आहे. कॅमेरा आणि मशीन लर्निंगच्या मदतीने फक्त तणावरच तणनाशके फवारणे शक्य होणार आहे. कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान, मार्केट ट्रेंड आणि जमा झालेल्या माहितीचा वापर करून पीक उत्पादन आणि विक्रीचा अंदाज बांधतो. शेतकरी आणि खरेदीदारांना थेट जोडता येते.  ब्लॉकचेन आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना थेट खरेदीदारांशी जोडता येते.

पशुपालनामध्ये वापर 

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुपालन व्यवसाय अधिक वैज्ञानिक, कार्यक्षम बनवता येवू शकतो.  सेंसर आणि कॅमेराचा वापरकरून जनावरांचे आरोग्य, खाद्य व्यवस्थापन आणि दुधाच्या उत्पादनाचे निरीक्षण करता येते. जनावरांच्या आरोग्यावर नजर, वर्तणूक विश्लेषणाद्वारे आजाराची लक्षणे, दुग्धोत्पादनाचे अंदाज, आहार व्यवस्थापन सुधारणे किंवा गरजेनुसार अन्नाचे प्रमाण आणि वेळ निश्चित करता येते.

कॅटल आय प्रणालीचा वापर करून आपणास जनावराच्या चालण्यातील बदल ओळखून आजाराची संभाव्य कल्पना येते.  प्रणालीचा वापर करून गायीच्या प्रसूतीचा अंदाज घेऊन त्याबद्दल पशुपालकांना मोबाइल संदेश पाठवता येतो. 

(डॉ. सोनम काळे हे एम.जी.एम.कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय,गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर आणि डॉ. योगेश पाटील हे श्री धनेश्वरी कृषी  महाविद्यालय, पैठण रोड, जि.छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT