Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : ज्ञानमार्गावरील वाटसरू

Team Agrowon

मारुती चव्हाण

Vineyard Management : सांगली जिल्ह्यातील पलूस तसं दुष्काळीच. पावसावर अवलंबून असलेली शेती. वडिलांसह तीन भावाचे एकत्र कुटुंब. आजोबा कै. धोंडी यांच्या वेळी ३२ एकर शेती होती. आजोबा आणि वडील केशव यांचे बहुतांश आयुष्य कोरडवाहू शेती करण्यात गेलं. आज वडिलांचं वय ९३ वर्षे. त्यांनी ७२ चा दुष्काळ अनुभवलाय. तशा बिकट परिस्थितीतूनही कष्टाच्या बळावर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्हा भावंडांचे एका बाजूला शिक्षण सुरू असतानाच शेतीतही मदत करत होतो. त्यातल्या एक बाब चांगली होती, ती म्हणजे आमचा एक काका (वडिलांचा भाऊ) आणि माझा एक चुलत भाऊ किर्लोस्कर कंपनीत नोकरीला होता. त्यातून दोन पैसे नियमित घरात येत होते, त्यावर कुटुंब कसेबसे चालत होते.

पाण्याअभावी शेतीमध्ये उत्पन्नापेक्षा अडचणीच जास्त. १९७३ मध्ये गावात पाणी योजना सुरू झाली. पाणी शेतात आणलं. मात्र घर शेतीवर कर्जाचा बोजा चढला. ऊस, सोयाबीन, गहू पिकं घेता येऊ लागली. कष्टाची सवय तर होतीच, पण मिळणारा पै-पै जोडून कर्ज फेडता येईल, असा विश्‍वास वाटत होता. पण १९७८ मध्ये अचानक योजना बंद पडली. नियमित पाणी बंद झालं. दहा वर्षे कर्ज थकलेच नाही, तर व्याज वाढत डोंगराएवढं झालं.

भूविकास बॅंकेला तारण असलेलं घर आणि शेतीवर जप्तीच्या नोटिसा आल्या. अधिकारी दारात येऊन कर्ज भरण्याचा तगादा करू लागले. कुटुंब एकत्र असल्याने पुन्हा चिवटपणे, कष्टाने पुढे गेलो नक्कीच या संकटातून बाहेर पडू, असं वाटत होतं.

कितीही अडचणी आल्या तरी शेती विकायची नाही, हे ठरवलं. मात्र या साऱ्या अडचणीत आमच्या शिक्षणाची परवड झाली. दोन वर्षांनं बंद पडलेली योजना पुन्हा सुरू झाली. पुन्हा पाटातून खळखळणाऱ्या पाण्यासोबत स्वप्नं खळखळू लागली.

दुभत्या जनावरांवर कुटुंबाची भिस्त

१९८८-८९ मध्ये मी दहावीत असतानाच वडील, चुलते यांच्या काबाड कष्टाने थोडीफार का होईना कुटुंबाची आर्थिक घडी बसू लागली होती. याच दरम्यान, कुटुंब विभागलं. वडिलांच्या वाट्याला साडेनऊ एकर शेती आली. कुटुंबाचं अर्थचक्र पुन्हा मातीत रुतलं. बॅंकेचं कर्ज वाढत होतं.

थोड्या बागायती शेतीत राबायचं आणि पोट भरायचं एवढंच सुरू होतं. १९८८ मध्ये मळ्यात छपराचं घर उभारलं. तिथंच दावणीला असलेल्या सात-आठ म्हशी, एक देशी गाई, दोन बैल अशा जित्राबांसाठी गोठा केला. पहाटे पाचला उठून गोठ्यातील कामे उरकायची. कॉलेजला जाताना सायकलीला दुधाच्या किटल्या असायच्या.

डेअरीत दूध घालून थेट कॉलेज गाठायचं, असा नित्यक्रम. त्याच वेळी किसन पवार यांची जमीन वाट्याने घेतली. त्यात ऊस लागवड केली. कॉलेज करतच जनावरं आणि शेती कसायला लागलो. पण लोकांची मजुरी देण्याइतके रोख पैसे खिशात नव्हते. पण नव्या हुंबाडीने आम्ही (वडील केशव, आई इंदूबाई, भाऊ माधव आणि मी) रात्र-दिवस कष्ट उपसत होतो. संकटावर मात करायची तर पुढचं शिक्षण घेतलंच पाहिजे, याची जाण होती. इंजिनिअरिंग होणे, मिलिट्रीत जाणे असे दोन मार्ग डोळ्यांसमोर आले.

प्रतिकूल परिस्थितीत भाऊ माधव इंजिनिअर झाला होता. पैशांची चणचणीमुळे माझं इंजिनिअरिंग स्वप्न सोपे नव्हते. गावात किसन जोशी, बाबूराव जोशी, राजाराम पाटील, रामभाऊ निकम हे स्वातंत्र्य सैनिक होते. इंग्रजांच्या विरोधात कसे लढलो यांच्या कहाण्या ऐकत मोठं झाल्यामुळे मिलिटरीचंही आकर्षण होतं. योग्य मार्गदर्शन नसल्यानं तिथंही अपयश आलं. शेती सुरूच होती, त्यात अधिक लक्ष घातलं.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT