Grape Farming : द्राक्ष उत्पादकांशी जोडला गेलो

Article by M D Sawant : ‘ॲग्रोवन’ आणि त्यात दर गुरुवारी प्रसिद्ध होणारा द्राक्ष सल्ला या गोष्टीशी माझे अत्यंत जवळचे नाते राहिले आहे. या सल्ल्याच्या रूपाने राज्यातील द्राक्ष बागायतदारांशी संवाद व नाते तयार करण्याची संधी मला मिळत आली
M D Sawant
M D SawantAgrowon
Published on
Updated on

एम डी सावंत

Grape Farming Advice : ‘ॲग्रोवन’ आणि त्यात दर गुरुवारी प्रसिद्ध होणारा द्राक्ष सल्ला या गोष्टीशी माझे अत्यंत जवळचे नाते राहिले आहे. या सल्ल्याच्या रूपाने राज्यातील द्राक्ष बागायतदारांशी संवाद व नाते तयार करण्याची संधी मला मिळत आली. द्राक्षात केवडा, करपा आणि भुरी हे तीन महत्त्वाचे रोग आहेत. एकाच क्षेत्रात वेगवेगळ्या दिवशी छाटणी केलेल्या बागांमध्ये रोगनियंत्रण वेगवेगळे करावे लागते.

हा सर्व विचार केल्यानंतर द्राक्ष सल्ला अन्य पिकांप्रमाणे सरसकट देऊन चालणार नाही हे लक्षात आले. राज्यात नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे हे द्राक्ष शेतीचे प्रमुख विभाग. या चारही विभागांत हवामान नेहमीच वेगवेगळे असते. नाशिक व पुणे विभागांत प्रामुख्याने ताजी खाण्याची, तर सांगली, सोलापूर भागांत प्रामुख्याने बेदाणे बनविण्यासाठी द्राक्षे पिकवली जातात. साहजिकच वाण वेगळे, करावयाची कामे वेगवेगळी. ॲग्रोवनमध्ये आठवड्याचा द्राक्ष सल्ला लिहिताना या सर्व गोष्टी विचारात घेतल्या.

M D Sawant
Exportable Grape : कष्ट अन् प्रयोगशीलता हेच धन

शेतकऱ्यांना झाले फायदे प्रत्येक सल्ल्याच्या पहिल्या भागात चारही द्राक्ष विभागांतील वातावरणाचे पुढील आठवड्याचे पूर्वसंकेत असायचे. संभाव्य रोगांची माहिती व नियंत्रणाचे उपाय सुचविले जायचे. त्याला साजेशी छायाचित्रे व त्याचे वर्णनही असे. काही दिवसांपूर्वी विशिष्ट फवारणी झाली असल्यास आता फवारणीची जरुरी नाही हेही दिले जायचे. अशा लेखनामुळे द्राक्ष उत्पादकांना माझा छोटासा सल्लारूपी लेख आवडायचा.

वातावरणावर आधारित सल्ला असल्याने प्रतिबंधक फवारण्या शेतकऱ्यांना करता यायच्या. रोगनियंत्रण चांगले मिळायचेच. पण बऱ्याचवेळा अनावश्यक फवारण्या टाळल्या जायच्या. ‘लाउड स्पीकर’वर सामुदायिक वाचन प्रत्येक गुरुवारी सल्ला प्रसिद्ध व्हायचा. एका गुरुवारी मी तो देऊ शकलो नाही. तर सकाळपासून फोन वाजू लागला. त्या दिवशी पहिल्यांदा समजले की माझे भरपूर वाचक आहेत.

त्यानंतर कधीही द्राक्ष सल्ल्यात खंड पडला नाही. एका बागायतदाराने सांगितले, की दर गुरुवारी तासगावमध्ये उशिरा गेल्यास ॲग्रोवनचा अंक मिळतच नाही. एकदा सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी गावातून संध्याकाळी जात असताना ‘लाउड स्पीकर’वर माझ्या द्राक्ष सल्ल्याचे सामुदायिक वाचन चालू असल्याचे मला प्रत्यक्ष अनुभवता आले. त्या दिवशी मी खरोखरच भारावून गेलो.

M D Sawant
Grape Disease : पावसामुळे द्राक्षावर डाऊनी, घडकुज होण्याची शक्यता

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या विभागनिहाय चर्चासत्रांना माझ्या द्राक्ष सल्ल्याचे वाचक भेटायचे. आमच्या बागेतील रोगनियंत्रण तुमच्या सल्ल्याप्रमाणे चालते. असे एका बाजूला ऐकून बरे वाटायचे. तर दुसऱ्या बाजूला भीती वाटायची, की सल्ला चुकीचा निघाला तर माझ्यामुळे यांचे नुकसान होईल. द्राक्ष सल्ला माझ्यासाठी मोठा जबाबदारीचा विषय होता. सल्ल्यातील वातावरणाचे पूर्वसंकेत अचूक निघायचे.

छोट्या गावामध्ये पाऊस किती व केव्हा पडेल ही माहिती बागायतदारांना उपयोगी पडायची. सल्ल्याच्या माध्यमातून हवामानाची माहिती संकेतस्थळावरून कशी पाहायची त्याबाबत चर्चासत्रात मी अनेक वेळा सांगितले आहे. प्रत्येक द्राक्ष विभागातील बागायतदारांबरोबर दररोज मोबाइलवर संपर्कात असायचो. वातावरणात बदल झाला, की प्रत्येक दिवशी शंभरहून अधिक फोन यायचे. त्या वेळच्या संभाषणातून प्रत्येक विभागातील सद्यपरिस्थिती अचूक समजायची. त्यामुळेच द्राक्ष सल्ला अधिक अचूक व्हायचा. म्हणूनच तो बागायतदारांना आपला वाटायचा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com