Goat Market Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Market: तळेगाव ढमढेरे येथे बाजारात २००० शेळ्या-मेंढ्यांची आवक

Livestock Market: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता. ७) एकूण २००० हजार शेळी, बोकड व मेंढ्यांची आवक झाली.

Team Agrowon

Pune News: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता. ७) एकूण २००० हजार शेळी, बोकड व मेंढ्यांची आवक झाली.

त्यापैकी अकराशेची विक्री झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले व सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी दिली.

रविवारी आषाढी एकादशी व आषाढ महिन्यामुळे सोमवारी बाजारात जास्त व्यापारी येतील म्हणून पशुपालकांनी जास्त शेळ्या - मेंढ्यांची आवक केली. त्यापैकी ९०० शेळ्या- मेंढ्या पशुपालकांनी परत नेल्या.

आज बाजारात व्यापारी कमी आल्याने खरेदी-विक्री कमी झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. शेळी व बोकडाला १२००० ते २१००० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तर मेंढीला ६५०० ते १५००० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे.

बाजारात पुणे, अहिल्यानगर, सातारा, अलिबाग, मुंबई येथील व्यापारी आले होते. तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील मेंढपाळ व शेतकऱ्यांनी शेळी, बोकड व मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. विक्री झालेल्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आजचा बाजार आषाढामुळे मोठा भरला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Deforestation Crisis: धुळे, नंदुरबारमध्ये वनराईवर संकटाची छाया

Sugarcane Farming: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर ऊस लागवड

Onion Crop Destroy: भाव नसल्याने कांद्यावर फिरवले ‘रोटाव्हेटर’

Mineral Development Fund: दोन कोटी रुपयांचे निविष्ठा प्रकरण गाजणार विधिमंडळात

Onion Price Issue: आठ रुपयांत कांदा विकायचा तरी कसा? शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT