Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मराठवाड्यात नुकसानीचे क्षेत्र २ लाख २९ हजार हेक्टरवर

Heavy Rain Crop Loss : सप्टेंबरमध्ये पावसाने मराठवाड्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान केल्यानंतर ऑक्टोबर मध्ये काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेती पिकांना मोठा दणका दिला

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यात १ ऑक्टोबर पासून आजपर्यंत झालेल्या पावसामुळे प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झालेले क्षेत्र २ लाख २९ हजार ४४६ हेक्टरवर पोहोचले आहे. दिवसेंदिवस या क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसते आहे.

सप्टेंबरमध्ये पावसाने मराठवाड्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान केल्यानंतर ऑक्टोबर मध्ये काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेती पिकांना मोठा दणका दिला प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४३३ गावातील १ लाख ७२ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या १ लाख ३ हजार ३६२ वरील जिरायत पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील ३२ गावातील १० हजार २३२ शेतकऱ्यांच्या ४८५२ हेक्टरवरील बागायत पिकांना पावसाने दणका दिला आहे. लातूर जिल्ह्यातील १६० गाव शिवारातील ८१ हजार ९६६ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६५६ हेक्‍टरवरील जिरायत पिकांचे नुकसान केलं आहे.

याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील १३० गाव शिवारातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांच्या ६३५७६ हेक्टरवरील जिरायत शेती पिकाची नुकसान केले आहे. खरिपातील शेती पिकाचे दोन-तीन टप्प्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने झालेला उत्पादन खर्च भरून निघेल की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या संपूर्ण अशा येणाऱ्या रब्बी हंगामावर अवलंबून असणार आहेत.

९ व्यक्तींचा गेला जीव, १३८ जनावरांचाही मृत्यू

एक ऑक्टोबर पासून आतापर्यंत आलेल्या नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५, जालना, परभणी, नांदेड व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक मिळून नऊ व्यक्तींचा जीव गेला आहे. याशिवाय तब्बल १३८ जनावरांचाही या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील १४ ,परभणीतील ९, हिंगोलीमधील ३, नांदेडमधील ५, बीडमधील ३३, लातूरमधील १३ व धाराशीवमधील ४५ जनावरांचा समावेश आहे.

पडझड झालेल्या घरांची संख्या...

जालना जिल्ह्यातील पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली असून छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणीतील प्रत्येकी दोन तसेच नांदेडमधील एक, लातूरमधील चार व धाराशिवमधील १३२ मिळून १४३ कच्चा घरांची या नैसर्गिक आपत्तीत अंशतः पडझड झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील २८ झोपड्यांचेही या नैसर्गिक आपत्तीत मोठ नुकसान झाले. धाराशिवमधील २० व बीडमधील एक मिळून २१ गोठ्यांचे या नैसर्गिक आपत्तीने नुकसान केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेच्या दरात वाढ

US Soybean Production: अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज

Monsoon Rain Forecast: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कायम

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

SCROLL FOR NEXT