Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Crop Damage Compensation : या पावसाने जिल्ह्यातील नजर अंदाजे १ हजार ७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २ कोटी २६ लाख ४८ हजार १७५ रुपये इतके नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Soybean Crop Damage
Soybean Crop Damageagrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली. १८ व १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील नजर अंदाजे १ हजार ७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २ कोटी २६ लाख ४८ हजार १७५ रुपये इतके नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात १००४ मिलिमीटर म्हणजे १७० टक्के पाऊस झाला. जुलैमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील हळद, सोयाबीन, भुईमूग आणि भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

Soybean Crop Damage
Crop Damage : नुकसानीवर मलमपट्टी नको

या चार तालुक्यांतील ६ हजार ४१३ हेक्टरवरील पिके बाधित झाली. या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान झालेल्या पिकांसाठी ११ कोटी १३ लाखांच्या निधीची मागणी केली आहे.

Soybean Crop Damage
Onion Crop Damage : पुरंदरमध्ये पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान

जिल्ह्यात गेल्या आठवड्यता अधूनमधून जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. १८ व १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. याचा फटका मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील जिरायत, बागायत आणि फळ बागांना बसला. या दोन दिवसांत १ हजार ७० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

तालुकानिहाय नुकसान झालेल्या पिके

तालुका क्षेत्र (हेक्टर)

मिरज १९६.६५

वाळवा ८२.६५

कवठेमहांकाळ ७५१.७

जत ३९

एकूण १०७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com