Dharashiv News: उन्हाळ्याची तीव्रता वाढताच जिल्ह्यातील जलसाठ्यांतील पाणीसाठा वेगाने घटण्यास सुरवात झाली आहे. लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा सर्वांत कमी पातळीवर पोचला असून, त्या तुलनेत मध्यम आणि मोठ्या प्रकल्पाची स्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांजवळ पोचला आहे..परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा ६३.७९ टक्के इतका शिल्लक आहे. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ८९.३४८ दलघमी असून, सध्या प्रत्यक्षात ५६.९९७ दलघमी पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात उपयुक्त साठ्याची टक्केवारी ४८.३६ टक्के होती, त्या तुलनेत यंदा साठा अधिक असला तरी बाष्पीभवन आणि उपशामुळे तो झपाट्याने कमी होत आहे..Irrigation Water Issue: गाळामुळे गडहिंग्लजला पाटबंधारे लघू प्रकल्पातील साठा अल्प.मध्यम प्रकल्पांचा लेखाजोखा (१७ प्रकल्प)जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठ्याची टक्केवारी ५९.३९ टक्केवर आली आहे. तेरणा मध्यम प्रकल्पात ६५.९६ टक्के, कुरनूर प्रकल्पात ६२.७६ टक्के, साकत प्रकल्पात ६८.६१ टक्के, खंडेश्वरमध्ये ३६.३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे..यंदा जलसाठा ‘प्लस’मध्येधाराशिव जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यंदा ११ मार्च २०२६ पर्यंतची पाणीपातळी पाहता मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा लक्षणीयरीत्या अधिक आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३९.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता, मात्र यंदा तो ५४.५१ टक्के इतका आहे. मोठ्या प्रकल्पासह मध्यम प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा तीव्र पाणीटंचाईची झळ कमी बसण्याची शक्यता आहे..आठवडाभरात मोठी घटजिल्ह्यात एकूण उपयुक्त पाणीसाठा ५४.५१ टक्के आहे. मागील वर्षी याच काळात ही टक्केवारी केवळ ३९.८३ टक्के होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा साठा जास्त दिसत असला, तरी अनेक प्रकल्पांमध्ये आठवडाभरात मोठी घट झाली आहे..Water Shortage: फुलवडे येथील पाझर तलावाने गाठला तळ.लघुप्रकल्प, साठवण तलावांची स्थिती२०८ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ५०.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कळंब तालुक्यातील बारातेवाडी आणि वडश्वरा प्रकल्पातील उपयुक्त साठा निरंक आहे. धाराशिव तालुक्यातील करजखेडा (३१.६१ टक्के), खामसवाडी (३३ टक्के) आणि येवती (३०.५१ टक्के) प्रकल्पांतील पाणीसाठा घटला आहे..उपयुक्त साठा आकडेवारीतमोठे प्रकल्प (१) : ६३.७९ टक्केमध्यम प्रकल्प (१७): ५९.३९ टक्केलघुप्रकल्प (२०८): ५०.२९ टक्केएकूण २२६ ः ५४.५१ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.