Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage Relief : तहानलेल्या ३७ गावांतील पाणी टंचाईमुक्तीसाठी उपाययोजनांना मंजुरी

Approval to Implement Water Measures : अकोला, अकोट व बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील ३७ गावांत ४० उपाययोजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. ४३ लाख ३९ हजार ३४ रुपयांच्या खर्चाला त्यांनी मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Akola News : दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. पाणी टंचाईपासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला, अकोट व बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील ३७ गावांत ४० उपाययोजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. ४३ लाख ३९ हजार ३४ रुपयांच्या खर्चाला त्यांनी मंजुरी दिली आहे.

उन्हाळ्यात ग्रामीण भागातील रहिवाशी नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्याअंतर्गत या वर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या कालावधीसाठी संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.

या गावात राबविणार उपाययोजना

अकोट तालुका : मानकरी, जनुना, बेस्तापूर, चिंचपाणी, माडी.

अकोला : बाखराबाद, वाशिंबा, बोरगाव मंजू, वणी रंभापूर, राजापूर, निपाणा, टाकळी पोटे, तामशी, ढगा कोठारी, वाकळी, जवळा, दूधलम, सोनखास, पातूर नंदापूर, कानशिवणी, खरप खुर्द, चांदूर, येवता, कुंभारी, येळवण, सुकळी नंदापूर, मासा.

बार्शीटाकळी : पैसाळी, सुकळी, रूस्तमाबाद, आळंदा, पिंपळखुटा, परांडा, गोरव्हा, विझोरा, कान्हेरी सरप, वरखेड या गावांसाठी प्रत्येकी विंधन विहिरींची उपाययोजना राबविण्यास मंजूर प्रदान करण्यात आली आहे.

१५ एप्रिलची मुदत

विंधन विहीर मंजूर करण्यात आलेल्या गावात जलपुनर्भरण करण्याची जबाबदारी वरिष्ठ भुवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांची राहील, असे जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

विंधन विहिरी, कुपनलिका अथवा विहीर अधिग्रहित केलेली असल्यास कोणत्याही कामाअगोदर जिल्हा परिषद यंत्रणेने पाणी नमुना चाचणी घेऊन जनतेस शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याची खात्री करावी. त्यासोबत सदर कामे १५ एप्रिलपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून त्याद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP: ‘एफआरपी’पेक्षा १०० रुपये अधिकचा दर

CM Devendra Fadnavis: साखरेची ‘एमएसपी’, इथेनॉलचे दर वाढवा

Agriculture Reform: संत्रा बागायतदारांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ उभारा

Cotton Rate: आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत बाजारांत कापसाच्या भावात नरमाई

Weather Update: थंडीची चाहूल, गारठा वाढतोय

SCROLL FOR NEXT