Marathwada Water Storage : नऊ मध्यम प्रकल्पांत केवळ २८ टक्के पाणीसाठा

Dam Water Storage : मोठे, लघू प्रकल्पही तळाला; १०४ प्रकल्पांत ३४ टक्के पाणीसाठा
Vishnupuri Irrigation Project
Vishnupuri Irrigation ProjectAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Water Shortage : नांदेड : जिल्ह्यात उन्हाचा तडाका वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांपैकी मध्यम प्रकल्पांत केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पातही पाणीसाठा कमी झाला आहे. एकूण १०४ प्रकल्पांत २५०.४७ दशलक्ष घनमीटरनुसार ३४.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा ४१ अंशावर पोचल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांपैकी मानारमध्ये ३३ टक्के तर विष्णुपुरी प्रकल्पात ३९.८७ टक्के पाणीसाठा खालावला आहे. तर ९ मध्यम प्रकल्पांत २८ टक्के पाणी शिल्लक आहे. तसेच ८० लघू प्रकल्पांचाही पाणीसाठा ३४.०४ टक्के शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पांत २५२.४७ दशलक्ष घनमीटरनुसार ३४.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी प्रकल्पात ३२४.४४ दशलक्ष घनमीटरनुसार ३९.९४ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच सिद्धेश्वर प्रकल्पात १०.५५ दशलक्ष घनमीटरनुसार १३.०३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर इसापूर प्रकल्पात ४९४.७९ दशलक्ष घनमीटरनुसार ५१.३२ टक्के पाणीसाठा आहे.

Vishnupuri Irrigation Project
Water Storage : परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा

दरम्यान मागीलवर्षी याच काळात जिल्ह्यातील या प्रकल्पात ३१७.७७ दशलक्ष घनमीटरनुसार ४३.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक असताना पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आगामी काळात जिल्हा वासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.


गतवर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा खालावला
नांदेड जिल्ह्यात दोन मोठे, नऊ मध्यम, नऊ उच्च पातळी बंधारे, ८० लघू प्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधारे असे एकूण १०४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात सध्या पूर्णजल क्षमता ५६७ दलघमी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर आणि ऊर्ध्व पैनगंगा इसापूर प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा खालावला आहे.


जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा (दलघमी)
प्रकल्पाचे नाव....उपयुक्त पाणीसाठा....टक्केवारी
मानार....४५.७३....३३.०९

विष्णुपुरी....३२.२१....३९.८७
मध्यम प्रकल्प (नऊ)....३९.०९....२८.११
उच्च पातळी बंधारे (नऊ)....७६.२४....४०.१७
लघू प्रकल्प (८०)....५८.८३....३४.०४
कोल्हापुरी बंधारे (चार)....०.३७....५.०३
एकूण....(१०४)....२५२.४७....३४.६७

जिल्ह्यालगत प्रकल्पांतील पाणीसाठा (दलघमी)
येलदरी (हिंगोली)....३२४.४९....३९.९४
सिद्धेश्वर (हिंगोली)....१०.५५....१३.०३
इसापूर (यवतमाळ)....४९४.७९....५१.३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com