Water pH : पाण्याच्या ‘पीएच’बाबत भूजलकडे मागविली माहिती

Agriculture Department : कीटकनाशक तसेच पीक वाढ संजीवकाची परिणामकारकता साधण्यासाठी पाण्याचा पीएच तसेच क्षारता महत्त्वाची ठरते.
Water pH
Water pHAgrowon

Yavatmal News : कीटकनाशक तसेच पीक वाढ संजीवकाची परिणामकारकता साधण्यासाठी पाण्याचा पीएच तसेच क्षारता महत्त्वाची ठरते. मात्र याबाबत राज्याचा गुणनियंत्रण विभागच अनभिज्ञ असल्याचे धक्‍कादायक वास्तव माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले होते. या बाबत ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रकाशीत होताच कृषी विभागाने आपली चूक सुधारत आता भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेकडून राज्यातील पाण्याचा पीएच व इतर आनुषंगिक माहिती मागविली आहे.

पाण्यात कोणतेही रसायन मिसळल्यानंतर त्याची अपेक्षित परिणामकारकता साधण्यासाठी पाण्याचा पीएच व क्षारता ही महत्त्वाची ठरते. कीटकनाशक तसेच पीक वाढ संजीवकांचे परिणाम साधण्यासाठी जागतिकस्तरावर ६.५ ते ७.५ इतका पीएच असावा अशी मान्यता आहे. भारतात मात्र गेल्या अनेक दशकांत यावर संशोधन आणि जागृतीही झाली नाही.

(ॲग्रो विशेष)

Water pH
Agriculture Irrigation : वीजनिर्मितीचे १२ टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव ठेवा

त्याच्याच परिणामी कीटकनाशक तसेच पीक वाढ संजीवकांचे अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने शेतकरी कीटकनाशकाचे प्रमाण वाढवितात. यातूनच फवारणी करणाऱ्याच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव दिसून येत विषबाधेचे प्रकार घडतात.

त्या पार्श्‍वभूमीवर कृषी आयुक्‍तालय स्तरावरील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाकडे या संबंधाने शेतकरी संघटनाप्रणीत तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान विस्तार आघाडीकडून माहिती मागविण्यात आली होती.

परंतु अशाप्रकारची कोणतीच माहिती या विभागाकडे नसल्याचे संघटनेला लेखी कळविण्यात आले. त्यावरूनच पाण्याच्या पीएचबाबत या विभागाची अज्ञानता चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली होती.

Water pH
Agriculture Irrigation : शेतीसाठी जिहे-कठापूरचे आवर्तन सुरू करा

या संदर्भाने बुधवारी (ता. २७) ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर कृषी विभागाने आपली चूक सुधारत त्याच दिवशी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या संचालकांना पत्र लिहीत महाराष्ट्रातील भू व भूपृष्ठ गुणवत्तेची माहिती सादर करण्याची विनंती केली आहे.

ही माहिती केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती फरीदाबाद या संस्थेला पाठविण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद आहे. त्यामुळेच आता पाण्याच्या पीएचबाबतही गुणनियंत्रण विभाग गांभीर्याने दखल घेत असल्याचे सिद्ध झाले आहे.

राज्याच्या गुणनियंत्रण विभागाकडे द्रावणासाठी पूरक पाण्याचा पीएच व क्षारता या संदर्भाने माहिती नसल्याचे कळाल्यावर धक्‍का बसला होता. आता मात्र कीटकनाशके मंडळ व नोंदणी समिती फरिदाबादकडूनच देश पातळीवर हा विषय हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे कीटकनाशक व पीक वाढ संजीवकाचा परिणाम साधण्यास मदत होईल.
- मिलिंद दामले, प्रमुख, तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान विस्तार आघाडी, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com