Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Tourism : उजनी धरण परिसराच्या पर्यटन आराखड्याला मान्यता

Tourism Plan Approval : पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उजनी धरण परिसरातील २८२ कोटी ७५ लाख निधीची मान्यता दिली.

Team Agrowon

Pune News : पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उजनी धरण परिसरातील २८२ कोटी ७५ लाख रुपये निधीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला गुरुवारी (ता. ५) शिखर समितीने मान्यता दिली.

या निर्णयामुळे उजनी धरण परिसरातल्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने सादर केलेल्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने पर्यटन विकासाला गती मिळणार आहे.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या उजनीच्या एकात्मिक विकास आराखड्यामध्ये धार्मिक पर्यटनासाठी २५ कोटी, जल पर्यटनासाठी १९० कोटी १९ लाख कोटी, कृषी पर्यटनासाठी १९ कोटी ३० लाख कोटी, विनयार्ड पर्यटनासाठी ४८ कोटी२६ लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यांच्या कामाची अंमलबजावणी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे.

साताऱ्यासह लोणारला निधी

सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यांतर्गत कोयना हेळवाक वन झोनच्या वाढीव ६७.८५ कोटी रुपयांच्या कामासह लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत मंजूर कामांवरील वाढीव ६४.८३ कोटी रुपयांच्या मागणीला सुद्धा शिखर समितीने मान्यता दिली.

सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील धार्मिक ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत कोयना हेळवाक वन झोनच्या तसेच बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन आणि विकास आराखडा अंतर्गत वाढीव ६४.८३ कोटी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Story: जगाचा शब्द नाही, तर सोन्याचा श्वास ऐकला !

Harshavardhan Sapkal: ‘झेडपी’त ‘घड्याळ’बरोबर काँग्रेसची आघाडी नाही

New Seed Bill: नवीन बियाणे विधेयक शेतकरी हिताचे: कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

Jowar Farming: खानदेशात दादर ज्वारी पीक निसवले

Wheat Flour Export: पाच लाख टन गहू पीठ निर्यातीस केंद्र सरकारकडून परवानगी

SCROLL FOR NEXT