Cabinet Decision  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cabinet Decision: राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापनेस मान्यता

Establishment of ST Commission: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व आनुषंगिक खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व आनुषंगिक खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडित विषय वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. तसेच ५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती.

त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात येत आहे. या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगाप्रमाणेच एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य अशी राहील. आयोगाकरिता नव्याने २६ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचे वेतन, भत्ते आणि कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर जागा,

फर्निचर, वीज, दूरध्वनी, इंधन यांसह आनुषंगिक खर्चासाठी ४ कोटी २० लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, अनुसूचित जाती आयोगदेखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली.

कामगार विमा योजनेच्या रुग्णालयांसाठी १५ एकर जमीन

छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी १५ एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यांसह बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती (पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रुग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता दिली.

कुर्ला डेअरीच्या जागा हस्तांतरात सुधारणा

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विभागाची असलेली कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही जागा हस्तांतर करताना अटी आणि शर्तींमध्ये सुधारणांना मान्यता देण्यात आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ८.५ हेक्टर जागा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून महसूल विभागाकडे हस्तांतर केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Cattle Conservation: गोवंश संवर्धनाचा भार शेतकरी-गोपालकांवर पडू नये; खासदार मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा

Fake Recruitment Case: बोगस भरती प्रकरणी आत्मा प्रकल्प संचालकाला अटक

Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT