
Pune News : देशात काही दिवसांवरच लोकसभा निवडणूका लागणार आहेत. यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना खूश करणाऱ्या अनेक घोषणांचा सपाटा सुरू केला आहे. यादरम्यान 'पीएम सूर्य घर' योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी (ता.२९) पत्रकार परिषदेत दिल्ली येथे दिली. तसेच मोदी सरकार १७ लाख लोकांना रोजगार देणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर पुढे म्हणाले, "पीएम सूर्य घर' योजनेद्वारे एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळेल. तर या योजनेमुळे सर्वसामान्यांना १५००० रूपयाचा फायदा होईल. २ किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी सरकार ६० टक्के अनुदान देईल. तर २ किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पात १ किलोवॅट अधिक वाढवायचे असल्यास ४० टक्के अनुदान देखील दिले जाईल. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला सुमारे ७८,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे,: असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
'पीएम सूर्य घर' योजनेसाठी सरकारने ७५००० कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहेत. तर आरडब्ल्यूए किंवा ग्रुप हाऊसिंग सोसायटीला विद्युत वाहनांसाठी सामान्य प्रकाश किंवा चार्जरसाठी प्लांट उभारण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे. यासाठी १८००० रूपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.
राष्ट्रीय पोर्टल सुरू
योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले असून रूफटॉप सोलर प्लांट बसवणाऱ्यांना बँकेकडून सुलभ हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाईल असे ठाकूर यांनी म्हटले आहे. या अंतर्गत ग्रामीण भागाला मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून विकसित केले जाणार असून उरलेली वीज विकूनही पैसेही कमवू शकतील. रुफटॉप सोलरद्वारे निवासी क्षेत्रात ३० गीगा वॅट सौरऊर्जा क्षमता वाढवली जाईल. ही योजना उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, O&M आणि इतर सेवांमध्ये १७ लाख लोकांना थेट रोजगार देईल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ठाकूर म्हणाले, "खतांच्या किंमती स्थिर ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला असून यंदाही खताची किंमत गतवर्षीप्रमाणेच राहतील. त्यात कोणताही बदल अथवा दरात वाढ करण्यात येणार नाही", असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या असल्या तरी डीएपीची किंमत तशीच राहणार आहे. डीएपीसाठी सरकारने २४००० कोटी रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२४ (१ एप्रिल २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४) साठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान योजनेंतर्गत ३ नवीन खतांना समाविष्ट करण्यास मान्यता दिल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.