Maharashtra Infrastructure Project Controversy: ‘‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे,’’ अशा घोषणा देत खानापूर तालुक्यातील महिलांनी हातात लाटणे घेऊन सोमवारी (ता. २२) विटा शहरात मोर्चा काढला. शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. .या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे संघटक ॲड. सुभाष पाटील म्हणाले, की भांडवलदारांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठचा घाट घातला आहे..Shaktipeeth Highway Project: अंगावर गोळ्या झेलू, पण ‘शक्तिपीठ’ होऊ देणार नाही.बी. जी. पाटील म्हणाले, की सांगली - सातारा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांची भूमी आहे. त्यांच्या स्टाईलने शक्तिपीठ विरोधात लढा उभारावा लागेल..Shaktipeeth Highway Protest: ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’; प्रस्तावित महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा.धनाजी गुरव, ॲड. स्वाती पाटील यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. दरम्यान, मोर्चा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी बंदोबस्त ठेवला होता. या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार,.उमेश देशमुख, सुश्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश कुपाडे, प्रतिभा काटकर, संग्राम देशमुख, ॲड. नानासाहेब पाटील, सुवर्णा पाटील, सुरेखा जाधव, नयना पाटील, श्रीदास होनमाने, जयराम जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.