Maharashtra Cabinet Decision: तीर्थक्षेत्राच्या संवर्धनासाठी ५५०३ कोटींच्या निधीला मान्यता

Pilgrimage Site Conservation Fund: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडळाने ५५०३ कोटी रुपयांच्या निधीसह तीर्थक्षेत्र संवर्धन, शैक्षणिक व महिलांसाठी सक्षमीकरण कार्यक्रम जाहीर केले. चौंडी येथे पार पडलेल्या ऐतिहासिक बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
Pilgrimage Site Conservation
Pilgrimage Site ConservationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांनी उभारलेल्या विविध बाबींचे संवर्धन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. ६) घेतला. तसेच राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या जतन आणि संवर्धनासाठी ५५०३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच, अहिल्यानगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राहुरी येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती सोहळा उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. ६) अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या वेळी उपस्थित होते.

Pilgrimage Site Conservation
Maharashtra cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय

बैठकीत झालेले प्रमुख निर्णय

अहिल्यादेवी यांच्या चोंडी येथील स्मृतिस्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी ६८१ कोटींच्या आराखड्याला मान्यता.

तीर्थक्षेत्र जतन व संवर्धनासाठी राज्यातील अष्टविनायक मंदिरासाठी १४७ कोटी, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटी, ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २६९ कोटी, त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी, महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी १४४५ कोटी, माहूरगड मंदिर विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपये खर्चाच्या तरतुदीला मान्यता.

अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, खास मुलींसाठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) होणार.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा परिचय देणारा बहुभाषिक व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरातून चित्रपट निर्मिती करणार.

महिलांसाठी सक्षमीकरण आदिशक्ती अभियान, जनजागृती, महिला व संस्थांना आदिशक्ती पुरस्कार योजना.

Pilgrimage Site Conservation
Maharashtra cabinet decisions : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय; भूसंपादन अधिनियमात सुधारणा

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मोठ्या शाळेत शिकण्यासाठी यशवंत विद्यार्थी योजना व त्यातून सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे.

दहावीनंतर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभाग स्तरावर वस्तीग्रह योजना. पुणे व नागपूर येथे याचे काम तातडीने सुरू होत आहे. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह.

अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जन्मोत्सवानिमित्त प्रेरणा गीत, पोस्टाचे तिकीट व त्रिशताब्दी लोगो प्रसारण.

नाशिक येत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजच्या धरतीवर कुंभमेळा प्राधिकरण कायदा.

चांदवड, जेजुरी येथील मल्हार गौतमेश्वर व त्र्यंबकेश्वर येथील प्राथमिक विहिरी सहा घाट सहा कुंड ३४ जलाशयाचा समावेश.

राज्य शासनाने राबवलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर आता सहा मे ते २ ऑक्टोबर या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला विकसित महाराष्ट्र २०१७ अंतर्गत विभागाचा रोड मॅप

सर्व कार्यालय शंभर टक्के ई गव्हर्नर आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com