Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Scheme : ‘सामूहिक शेततळे’ योजनेसाठी अर्ज करा

Dr. Kiran Patil : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासह, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Team Agrowon

Buldhana News : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासह, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर २०२२ पासून राज्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे, जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत ६३ शेततळे पूर्ण झाले असून सध्याच्या मोठ्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके तसेच फळबागाच्या संरक्षित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

या योजनेत सहभागी होण्याकरिता अर्जदार शेतकऱ्यांकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

सध्याची पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग व भाजीपाला पिके वाचविण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विहीर व बोअरवेल तसेच परतीच्या पावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयापर्यंत व अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी १ लाख ५० हजार रुपयापर्यंत अनुदान मिळते.

काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येते. यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएसी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाइन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

पात्र शेतकऱ्यांसाठी देय अनुदान

या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे अनुदान देय आहे. दोन हेक्टर ते पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्र असल्यास ३ लाख ३९ हजार रुपये अनुदान तसेच एक ते दोन हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असल्यास १ लाख ७५ हजारांएवढे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते,

की सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT