Orchard Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Farming : फळपिके, फुलपिके, बांबू लागवडीसाठी अर्जाची संधी

MGNREGA : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Baramati News : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. चालू २०२४-२५ वर्षामध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाच्या कृषी सहायकांकडे अर्ज करावा, असे आवाहन प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

फळबाग लागवड योजनेत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रूट, केळी, द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा, निशिगंध या फुलपिकांसाठी व २०२४-२५ या वर्षात बांबू लागवड मोहीम स्वरूपात करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवडीस बारामती २४० हेक्टर, इंदापूर २३० हेक्टर, दौंड- २२२ हेक्टर व पुरंदर २२० हेक्टर असे एकूण ९१२ हेक्टरवर फळपीक, फुलपीक व बांबू लागवडीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे निकष, विद्यापीठ शिफारशीनुसार अंतर मर्यादेतच देय राहील. अतिरिक्त कलमे, रोपे यांचे अनुदान दिले जाणार नाही. लागवड वर्षासह सलग ३ वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील.

दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरीता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जीवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांचे ७५ टक्के फळझाडे जीवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी २० रोपे या मर्यादेत ही योजना राबविण्यात येते.

प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीत कमी ०.०५ हेक्टर व जास्तीत जास्त २.०० हेक्टर आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक राहील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, द्रारिद्र्य रषेखालील व्यक्तींना तसेच अल्प व अत्यल्प, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी ग्रामपंचायतीचे जॉबकार्ड धारक असावा, असे लाभार्थी निवडीचे निकष आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Superintendent Agriculture Officer: लातूरच्या ‘एसएओ’पदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती

Road Project: मोहोळ-तांदूळवाडी मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Political Controversy: गाळे बांधकामाबाबतीत आरोप राजकीय हेतूने प्रेरित

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

SCROLL FOR NEXT