Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विम्यातील आंबिया बहरासाठी अर्ज स्वीकारणी सुरू

Application of Agriculture Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेच्या २०२४-२५ मधील आंबिया बहराकरिता नोंदणी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेच्या २०२४-२५ मधील आंबिया बहराकरिता नोंदणी सुरू झाली आहे.

डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी अशा नऊ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांना या योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. मात्र योजनेत सहभागी होणार किंवा नाही याचे घोषणपत्र संबंधित शेतकऱ्यांना आपापल्या बॅंक शाखांमध्ये जमा करणे आवश्यक आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास विमा हप्त्याची कपात परस्पर बॅंक करणार आहे.

भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याला सहभागासाठी एका फळपीकाखालील किमान उत्पादनक्षम क्षेत्र कोकणात १० गुंठे किंवा ०.१० हेक्टर हवे. उर्वरित विभागातील शेतकऱ्यांचे हेच किमान क्षेत्र २० गुंठे किंवा ०.२० हेक्टर राहील. एका शेतकऱ्याला मृग व आंबिया बहार मिळून कमाल चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के इतका विमा हप्ता भरावा लागणार आहे.

अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट यामुळे फळबागांचे नुकसान झाल्यास या योजनेतून विमा भरपाई मिळते. शेतकऱ्यांनी सहभागासाठी ई-सेवा केंद्र, बँक किंवा वित्तीय संस्थांशी संपर्क साधावा. विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयातदेखील योजनेची माहिती मिळेल, असे कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटले आहे.

गारपिटीसाठी अतिरिक्त विमा हप्ता

शेतकऱ्यांना https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर योजनेची सेवा मिळू शकते. गारपिटीपासून होणाऱ्या नुकसानीबाबत विमा हवा असल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त विमा हप्ता आपापल्या बँकेत भरावा लागेल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT