Kusum Solar Pump Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Kusum Solar Scheme : कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट्सचा सुळसुळाट ; शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

Solar Pump Scheme : कुसुम योजनेच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या नावाने बनावट वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Agriculture Scheme Update : कुसुम योजनेच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेच्या नावाने बनावट वेबसाईट्स तयार करण्यात आल्या आहेत. या बनावट वेबसाईट्सवरून तसेच मोबाईलवर एसएमएस पाठवून शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी लिंक पाठवली जात असून अशा कोणत्याही फसव्या वेबसाईट्सला शेतकऱ्यांनी भेट देवू नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या पैशाचा भरणा करू नये, असे आवाहन महाउर्जाने केले आहे.

केंद्र आणि राज्य सरकाच्या माध्यामातून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आर्थिक लाभासह कृषी अवजारे, यंत्रसामग्री यासारख्या योजनांचा समावेश आहे. 'पंतप्रधान कुसुम-ब योजना' ही योजनाही यापैकीच एक आहे. राज्यात ही योजना महाऊर्जामार्फत राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान कुसुम-ब योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३. ५ आणि ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप देण्यात येतात. यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ९५ टक्के अनुदान दिले जाते. सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा संदेश पाठविला जातो.

अशा ओळखा फसव्या बेवसाईट

कुसुम योजनेच्या फसव्या वेबसाईट या बनावट डोमेन नावे .Org, .In, .Com जसे की, www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusumyojana.org.in, www.pmkusumyojana.com आणि याच प्रकारच्या अनेक बनावट वेबसाईट आहेत. त्यामुळे योजनेसाठी अर्ज करण्याऱ्या सर्व शेतकऱ्यांनी अशा फसव्या वेबसाईट्सवर जावू नये, तसेच कोणतेही शुल्क भरू नये.

योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा) च्या अधिकृत वेबसाईटला (www.mahaurja.com) भेट द्यावी किंवा ०२०-३५०००४५० या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक ए.व्ही.कुलकर्णी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT