Indigenous cattle  Agrowon
ॲग्रो विशेष

Indigenous Cattle : देशी गोवंश संवर्धनासाठी ॲप, आधार कार्ड निर्मिती

Indigenous Cow Breeds : देशी गोवंशाची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र ॲप आणि जनावरांचे स्वतंत्र आधार कार्ड तयार होत आहे.

अमित गद्रे

Pune News : राज्यातील खिल्लार, डांगी, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ, कठाणी, कोकण कपिला या गोवंशाचे संवर्धन आणि संशोधनासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने धोरणात्मक पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

आयोगाच्या माध्यमातून राज्यातील उपक्रमशील गोशाळा आणि अभ्यास पशुपालकांकडील जातिवंत गोवंशाची नोंद घेतली जात आहे. यासाठी स्वतंत्र ॲप आणि जनावरांचे स्वतंत्र आधार कार्ड तयार होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

वसुबारसेपासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यभरात विविध उपक्रमांना सुरुवात होत आहे. या बाबत मुंदडा म्हणाले, की आम्ही गेल्या चार महिन्यांत राज्यभरातील गोशाळांचा दौरा केला.

तसेच अभ्यासू पशुपालकांच्या नोंदी घेतल्या आहेत. जातिवंत गोवंश पैदास, संरक्षण, संवर्धन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, कृषी विद्यापीठ, ‘माफसू’ तसेच उपक्रमशील गोशाळांच्या सोबत विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे.

राज्यात सुमारे १,०६८ गोशाळा कार्यरत आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी शेण, गोमूत्रापासून सेंद्रिय खते, जिवामृत, पंचगव्य तसेच विविध गोयम उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीसाठी प्रोत्साहन देत आहोत.

या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणीसाठी आयोगाच्या माध्यमातून अद्ययावत प्रयोगशाळा उभारत आहोत. यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती होईल. वंश सुधारण्यासाठी गुणवत्तापूर्ण नोंदणीकृत रेतमात्रा पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जातिवंत पैदाशीसाठी चांगली दुधाळ गाय, पैदासक्षम वळूची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र ॲप तयार होत आहे. तसेच प्रत्येक गोशाळेतील जातिवंत जनावरांना ओळख क्रमांक आणि कार्ड देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आयोगाच्या माध्यमातून जातिवंत देशी गोवंशाचे प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करत आहोत. या माध्यमातून पशुपैदासकारांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शाळांमध्ये गोवंशाची ओळख...

ग्रामीण तसेच शहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत राज्यातील विविध देशी गोवंशाची ओळख आणि उपयोगिता समजण्यासाठी यंदाच्या बसुबारसेपासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

या बाबत श्री. मुंदडा म्हणाले, की पहिल्या टप्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील दहा शाळा आम्ही निवडल्या आहेत. या शाळांमध्ये देशी गोवंशाची माहिती देणारे प्रदर्शन तसेच चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत आहोत.

टप्प्याटप्प्याने राज्यभर हा उपक्रम पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देशी गोवंश पाहता यावेत तसेच विविध गो उत्पादनांची माहिती होण्यासाठी गोपाष्टमीच्या काळात परिसरातील गोशाळांमध्ये सहल नेण्यात येणार आहे. यातून शेती, गोवंशासोबत विद्यार्थी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Regulations: ट्रॅक्टरधारकांपुढील नवी आव्हाने

Turmeric Market: वायदेबंदीची अवास्तव मागणी

Agricultural Rain Damage: एक लाख २४ हजार हेक्टरवरील पिके बाधित

Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा

SCROLL FOR NEXT