Paddy Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

Registration Paddy Farmers : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

sandeep Shirguppe

Base Price Purchase Plan : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली.

मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु केली आहे. यामध्ये चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे, आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा.

राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे, राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित राशिवडे, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्यो ग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर. भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी, भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर.

शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी २ हजार १८३ रु. व रागी (नाचणी) करिता ३ हजार ८४६ रु. प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीची अंतिम मुदत दि. १५ जानेवारी २०२४ होती. परंतु शासन स्तरावरुन शेतकरी नोंदणीस दि. १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली असुन अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने धान व नाचणी विक्री करीता वरील ठिकाणी नोंदणी करावी, असे अवाहनही जिल्हा मार्केटिंग अधिकारी खाडे यांनी केले.

याबाबत अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज, अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहु मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT