Kolhapur Dudh Sangh : दूध उत्पादकांना लुटणाऱ्या १६ दूध संस्थांना दुग्ध सहाय्यक निबंधकांकडून लेटर बॉम्ब

Milk Production : दुधाचे फॅट तपासणीसाठी २० मिलीऐवजी ५० ते १०० मिली दूध घेतले जात आहे. दुधाचे फॅट किंवा एस.एन.एफ. न तपासताच दूध खरेदी केली जाते.
Kolhapur Dudh Sangh
Kolhapur Dudh Sanghagrowon
Published on
Updated on

Milk Officer Kolhapur : दुधाचे फॅट तपासणीसाठी २० मिलीऐवजी ५० ते १०० मिली दूध घेतले जात आहे. दुधाचे फॅट किंवा एस.एन.एफ. न तपासताच दूध खरेदी केली जाते, अशा करवीर तालुक्यातील चार, शिरोळमधील पाच आणि पन्हाळा तालुक्यातील सात अशा एकूण १६ संस्थांना कामाकाजामध्ये तत्काळ बदल करावा.

अन्यथा, संस्थांवर प्रशासक नियुक्त केला जाईल, असा इशारा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे आणि सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.

दानोळी (ता. शिरोळ) येथील एका दूध संस्थेत फॅट आणि एस.एन.एफ.ची तपासणी केली जात नाही. उत्पादकांकडून येणारे दूध हे लिटरप्रमाणे संकलन केले जाते. शेतकऱ्यांना त्यानुसारच पैसे दिले जात आहेत. मात्र, शासनाने दिलेल्या प्रमाणानुसार दूध संकलन होत नसल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

करवीर तालुक्यात भामटे गावातील दूध संस्थेत केवळ फॅटच पाहून दर दिला जात आहे. याठिकाणी एस.एन.एफ. पाहिले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ज्या-ज्या दूध संस्थांबाबत तक्रारी येतील त्यांची तपासणी होणारच आहे. मात्र, ज्यांची तक्रार येणार नाही तरीही आमच्या कार्यालयाकडून त्याची तपासणी केली जाणार आहे.

Kolhapur Dudh Sangh
Kolhapur Milk Fraud : दुधाच्या वजनकाट्यात दहा लिटरला ५०० ते ७०० मिलीपर्यंत फसवणूक

यासाठी विशेष पथक तयार केले जाईल, याशिवाय आम्ही स्वत:ही याची तपासणी करणार असल्याचे मालगावे यांनी सांगितले. दरम्यान, ज्या-ज्या संस्थांमध्ये तपासणी झाली आणि वजनामध्ये फरक आढळला आहे, अशा संस्थांना कलम ७९ नुसार नोटीस दिली जाईल. त्यानंतरही सुधारणा झाली नाही, तर प्रशासक नियुक्त करून न्याय दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या संस्थांना नोटीस

शिरोळ तालुका : जनसेवा दूध संस्था आणि वसंतदादा दूध संस्था (दोन्ही संस्था दानोळी). दिरबादेवी, रत्नदीप आणि महादेवी पद्मादेवी ( उदगाव).

पन्हाळा तालुका : माउली, श्रीकृष्ण, महादेव आणि शिवपार्वती (सर्व संस्था मरळी). शिवशाही, छत्रपती जिजाऊ महिला आणि दत्त (मल्हारपेठ).

करवीर तालुका : राजर्षी शाहू, राम आणि जोतिर्लिंग दूध संस्था (सर्व संस्था भामटे). हनुमान दूध संस्था (आरळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com