Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा

Crop Damage : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Team Agrowon

Bhandara News : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांना सरकारने सरसकट भरपाई जाहीर करावी, अशी मागणी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तसेच माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत भंडारा जिल्ह्यात झालेल्या गारपिटीत रब्बी पिकांसोबतच भाजीपाला व फळपिकांनाही बसला.

जिल्ह्यातील अनेक हेक्‍टरवरील भातशेती भुईसपाट झाली असून त्याचा खर्च काढणेही कठीण झाले आहे. त्यामध्ये तुमसर, मोहाडी या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान नोंदविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी भंडारा यांच्या सूचनेनुसार सर्व्हेक्षण व पंचनाम्याचे काम क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

परंतु नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने तसे आदेश अजूनही काढलेले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शिशुपाल पटले यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT