Akola News : तेल्हारा तालुक्यात १० मे रोजी झालेल्या तुफान पावसाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपूर, नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना झोडपले. शेकडो एकरावरील पपई व केळीच्या लदबदलेल्या फळबागा भुईसपाट.
या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केळी उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील इंगळे, राज्य समन्वयक सचिन कोरडे पाटील यांनी केली आहे.
या पदाधिकाऱ्यांनी केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण, अतुल माने पाटील यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली. या आपत्तीत शेकडो एकरातील केळी बागा उदध्वस्त झाल्या. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला परिसरात पूर्वमोसमी पाऊस व वादळ घोंगावले होते.
परिसरातील केळी व पपई उत्पादन शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. शेतातील काढणीला आलेले केळी व पपईच्या बागांमध्ये अतोनात नुकसान झाले. या भेटीदरम्यान माने पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष अनंता पाटील इंगळे, समन्वयक सचिन कोरडे पाटील , शेतकरी वैभव पोटे, हर्षल पोटे आदी शेतकरी उपस्थित होते.
वादळ व पावसामुळे केळी व पपईच्या बागांचे नुकसान झाले असून शासकीय स्तरावरून तत्काळ पंचनामे करून मदत मिळणे अपेक्षित आहे, अशी मागणी उत्पादक संघातर्फे अध्यक्ष किरण चव्हाण यांनीही केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.