Crop Damage : मांडवगणला तीन एकर केळीबाग भुईसपाट

Unseasonal Rain : मांडवगण फराटा येथील राजेंद्र मारुती घाडगे यांनी तीन एकरांत केळीची बाग लावली होती. बागेवर आजवर पाच लाख रुपये खर्च केला.
Crop Damage
Crop DamageAagowon
Published on
Updated on

Pune News : तालुक्यातील मांडवगण फराटा येथील राजेंद्र घाडगे या शेतकऱ्याची तीन एकरांवरील केळीची बाग वादळी वारा व पावसाने उन्मळून भुईसपाट झाली. त्यामुळे घाडगे यांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांचे या पावसात नुकसान झाले असून, प्रशासनाकडून अद्याप नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यात आला नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

मांडवगण फराटा येथील राजेंद्र मारुती घाडगे यांनी तीन एकरांत केळीची बाग लावली होती. बागेवर आजवर पाच लाख रुपये खर्च केला. मोठ्या प्रमाणात फळ आल्याने दहा दिवसांत तोडणी करून ते विक्रीसाठी पाठवायचे होते; पण सोमवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या पूर्व मोसमी पावसाने तीन एकरांतील केळीची बाग भुईसपाट झाली.

Crop Damage
Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

यात एकरी पाच लाखांचे नुकसान झाले. तसेच त्यांच्या वखारीत साठवलेला एक हजार पिशवी कांदाही भिजला. तसेच इतर शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. असे असतानाही प्रशासनाने या भागात पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. प्रशासनाने पंचनामा करून हातभार लावावा, अशी मागणी घाडगे यांनी केली आहे.

Crop Damage
Crop Damage : शेतकऱ्यांवर ‘अवकळा’

दोन दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील पूर्व भागाला वादळी वाऱ्याचा फटका बसला. अनेक भागात पडझड देखील झाली, तर अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वाऱ्याचा फटका मांडवगण फराटा, तांदळी, पिंपळसुटी परिसरात देखील बसला.

अगोदरच बाजारभावाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. प्रशासनाने पंचनामा करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

काढणीला आलेली केळी जमीनदोस्त

वादळामुळे सोमवारी मांडवगण फराटा येथील राजेंद्र जगताप, अनिल घाडगे, प्रभाकर घाडगे, तांदळी येथील सचिन गदादे, पिंपळसुटी येथील रामदास काळे, बाळासाहेब नलगे या शेतकऱ्यांच्या केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. ऐन तोडणीस आलेल्या काळात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com