Animal Husbandry Department App : राज्यभरात १ सप्टेंबर २०२४ पासून होणाऱ्या पशुगणना मोहिमेची सुरवात अद्याप झालेली नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या प्रायोगिक पशुगणना नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याआधीच थांबवण्यात आली आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाकडून ॲपमधील त्रुटी दूर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार दर पाच वर्षांनी पशुगणना करते. याआधी २०१९ मध्ये विसावी पशुगणना झाली होती. चालू वर्षी एकविसावी पशुगणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मोबाईलद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणीचे नियोजन केले होते. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता.
मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रायोगिक प्रयत्नात काही त्रुटी समोर आल्या. त्यामध्ये सुधारणा केल्यानंतर मोहीम सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पुढच्या महिन्यात हे काम सुरू होवू शकते. असे सध्याचे चित्र आहे. तेव्हा डिसेंबरअखेर ऐवजी ३१ जानेवारी २०२५ अखेरीस पशुगणना पूर्ण होण्यास कालावधी लागणार असल्याने १ महिना विलंब होऊ शकतो.
१ ऑक्टोबरपासून पशुगणनेला सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरवात होईल, अशी सध्या शासकीय अधिकारी पातळीवर चर्चा आहे. मात्र याबाबत कोणी ठामपणे सांगत नाही. ही गणना मोबाईल टॅबलेट आणि संगणकांच्या माध्यमातून होणार आहे. संपूर्ण आकडेवारी संकलित केली जाणार आहे.
‘टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची गणना होणार का?
शासकीय योजनांचे लाभ, दूध अनुदान, उपचार किंवा अन्य लाभ देण्यासाठी पशूंची टॅगिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु अद्यापही पशुधन टॅगिंगपासून वंचित राहिल्याची समजते आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जे घेतलेली नाहीत आणि गावापासून दूरवर असणाऱ्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या जनावरांचे टॅगिंग झालेले नाही. त्या जनावरांची पशुगणना होणार का, असा प्रश्न आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.