Onion Import : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू नये, अशी सरकारची नीती; कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil on Onion : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अफगाणिस्तानातून होणाऱ्या कांद्याच्या आयातीवरून सरकारवर टीका केली आहे.
Jayant Patil on Onion
Jayant Patil on OnionAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काद्यांच्या दरात तेजी आली असतानाच अफगाणिस्तानातून कांद्याची आयात सुरू झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू नये अशी सरकारची नीती असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

देशात कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधून १७ ट्रकमधून ३०० टन कांदा पंजाबमधील अमृतसर, जालिंदर या शहरांमध्ये दाखल झाला आहे. तर अजून ४५ ते ५० ट्रक सीमेवर उभे आहेत. हे ट्रक कांदा घेऊन पुढील दोन ते तीन दिवसात भारताच्या हद्दीत दाखल होतील. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभराताली कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Jayant Patil on Onion
Jayant Patil : इव्हेंट आणि जाहिरातींसाठी ४००-४०० कोटी रुपये खर्च करता, मग शेतकऱ्यांना मदत कधी? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला आहे. तेलबियांच्या आयातीसह तेल आयातीच्या धोरणावरून हेच सिद्ध होतं. शेतीमालाचा दर वाढायला लागला की सरकारच्या पोटात गोळा येतो. यामुळेच शेतीमालाचा कसा दर पडेल याची धोरणे आखली जातात. आपल्याकडे कांदा, सोयाबीन आहे. फक्त शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्यासाठी परदेशातून कांदा, सोयाबीनचे तेल हुडकून आयात केली जात, असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil on Onion
Onion Rate : केंद्राकडून घाऊक बाजारात 'बफर स्टॉक'मधून कांदा विक्री वाढविली, परदेशातही कांद्याला मागणी

सध्या राज्यासह देशभरात कांद्याचा चार पैसै मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जात असतानाच अफगानिस्तानमध्ये कांद्याचे दर घसरल्याने खासगी व्यापारी कांदा भारतात आणत आहेत. ते मालामाल होत आहेत. पण शेतकरी रडकुंडीला आल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील सरकारला कांदा रडवणार, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. राज्य आणि केंद्र सरकारला फक्त कांदाच नाही तर सोयाबीन, कपाशीसह सर्वच पीक सरकारला रडवणार. पीकं विमा काढूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, हाच प्रश्न सरकारच्या डोळ्यात पाणी आणणार. सरकारने कितीही घोषणा केल्या तरी राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता नाराज आहे. ते त्यांना मत देणार नसल्याचे जयंत पाटील सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com