Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : अनेर नदीपात्र कोरडेठाक

Aner River : भर उन्हाळ्यातही गारवा देणारी अनेर नदी उन्हाळ्यात कोरडी पडू लागली आहे.

Team Agrowon

Chopda News : अनेर नदी सातपुड्यातून वाहत येऊन सूर्यकन्या तापीला मिळणारी एक उपनदी. कधीकाळी मळ्यांचं हिरवं लेणं अंगावर घेऊन भर उन्हाळ्यातही गारवा देणारी जीवनदायिनी काळाच्या ओघात उन्हाळ्यात कोरडी पडू लागली असून, पात्रातील दगडगोटे तापून आग ओकू लागले आहेत.

खानदेशात अनेर नदीचे मासे जसे पूर्वापार प्रसिद्ध आहेत तसे या नदीतील दगडगोटेही प्रसिद्ध आहेत. आजही गोल गोटे आणि अंघोळीचा फेना पात्रातून गोळा करून राज्यासह गुजरातेत गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. साधारण १९७३ ते १९७८ च्या दरम्यान अनेर नदीवर गणपूर गावाजवळ धरण झाले.

त्यानंतर शिरपूर आणि चोपडा तालुक्यात डावा आणि उजवा कालवा होऊन शेतीला पाणी मिळू लागले. बरीच वर्षे हे पाणी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मिळत असे. मात्र, पुढेपुढे ते रब्बीसाठीच मिळू लागले आणि धुळ्यासह अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीसाठा राखीव झाला. पर्जन्यमान कमी झाले आणि नदी फेब्रुवारी, मार्चमध्येच लुप्त होऊ लागली. तिची धार आता जेमतेम दोन किलोमीटर टिकून पुढे सर्व दगडगोट्यांचे साम्राज्य दिसू लागले.

उन्हाळी हंगाम बंदच

साधारण १९८० ते १९९५ पर्यंत अनेर धरणाच्या कक्षेतील शिवारात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकत असे आणि जळगाव, धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त उन्हाळी भुईमूग पीक घेणारा हा पट्टा होता. मात्र, पाणीपुरवठा बंद झाल्याने रब्बीतील पिकेच फक्त पिकू लागली आणि भुईमुग इतिहासजमा झाला. कोट्यवधींचे उत्पादन आणि लाखोंची मजुरी बंदच झाली.

पाणीपुरवठा योजनांना ताण

मार्चपासून नदी कोरडी होऊ लागल्याने चोपडा व शिरपूर तालुक्याच्या काही पाणीपुरवठा योजनांना त्यामुळे अडचण येऊ लागली. एप्रिल ते जूनदरम्यान नदीकाठावरील विहिरी, कूपनलिका कोरड्या होऊ लागल्या. गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावू लागला. गेली अनेक वर्षे उन्हे तापू लागली की हा प्रश्‍न ऐरणीवर येतो.

नदीपात्रात पाणी सोडण्याची गरज

सद्यःस्थितीत गणपूरपर्यंत नदीची बारीक धार टिकते. मात्र पुढे भवाळे, गलंगी, घोडगाव, वेळोदे, होळनांथे, भावेर आदी भागात नदीत पाणीच नसल्याने प्रश्‍न निर्माण होतो. त्यासाठी नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्याची गरज सध्या आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Policy: राज्यातील मत्स्यखाद्य बंधनकारक : नीतेश राणे

Dhananjay Munde Corruption Case: धनंजय मुंडे यांना ‘क्लीन चीट’ नाही : दमानिया

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या २१०० कोटींच्या मान्यतेसाठी केंद्राला प्रस्ताव

Cotton Shortage: कापूसगाठींचे उत्पादन खानदेशात घटले

State Cooperative Bank: राज्य सहकारी बँकेचे सोसायट्यांना पाठबळ

SCROLL FOR NEXT