Chh. Sambhajinagar News : असामान्य प्रमाणात पडलेला पाऊस, पाणी वेगाने वाहून जाणारा असुरक्षित भूभाग, पाण्याचे अयोग्य नियोजन अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या एकत्र आल्यामुळे मराठवाड्याला अतिवृष्टीला तोंड द्यावे लागले, असा निष्कर्ष मराठवाडा अतिवृष्टी श्वेतपत्रिकेत काढण्यात आला आहे. या श्वेतपत्रिकेत अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीची कारणमीमांसा करण्याबरोबरच भविष्यात अशा संकटाचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या शिफारशीही केल्या आहेत..ग्लोबल विकास ट्रस्टच्या पुढाकारातून युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन (यूएनडीआरआर), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अराईज आणि त्रप्त धरा निर्मलचे जिओ हायड्रोलॉजिस्ट देवेंद्र जोशी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही श्वेतपत्रिका तयार करण्यात आली..श्वेतपत्रिकेतील निरीक्षणांनुसार, मॉन्सून हंगामाची सुरुवात मे महिन्यात झाली. जून, जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. दीर्घ कोरड्या कालावधीमुळे पिकांचे नुकसान झाले आणि चिकण मातीचा वरचा थर कडक झाला. त्यामुळे पाणी जमिनीत मुरणे कठीण झाले. ऑगस्टमध्ये पावसाने जोर धरला. .Flood Crop Damage : पाण्याचा लोंढा पीक नाही, जमीनच घेऊन गेला..!.या पावसाने आधीच खराब झालेल्या जमिनीला पूर्णपणे भिजवून टाकले. त्यामुळे आणखी पाणी शोषून घेण्याची क्षमता जमिनीत उरली नाही. सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस झाला. तीव्र आणि कमी वेळेत जास्त प्रमाणात झालेल्या या पावसाचे रूपांतर तत्काळ वेगाने वाहणाऱ्या भूपृष्ठवरील पाण्यात झाले..पाणीटंचाई केंद्रित मॉडेल ठरले असमर्थमराठवाडा म्हणजे पावसाची आणि पाण्याची तूट असलेला भाग. या भागात पूर नियंत्रणाऐवजी पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित केले जाते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे हे या भागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मानसिकतेमुळे प्रकल्पांमधून आधीच पाणी सोडण्यास नकार दिला गेला..टंचाई केंद्रित मॉडेल अतिरिक्त पाण्याच्या परिस्थितीला तोंड देण्यास असमर्थ ठरले. २००५ च्या कायद्यानुसार एकात्मिक जल व्यवस्थापन आवश्यक असले तरी पूर नियंत्रणासाठी या तत्त्वांची अंमलबजावणी केली गेली नाही. चुकीच्या वेळी प्रचंड प्रमाणात पाणी सोडले गेले. समन्वयाचा अभाव आणि खालावलेल्या पायाभूत सुविधा यासारख्या कारणांमुळे अनेक तज्ज्ञ व परिसरातील लोकांनी याला मानवनिर्मित आपत्ती म्हटले..भूगर्भीय रचनाही कारणतीव्र पाऊस शोषून घेण्यास आयोग्य असलेली भूगर्भीय रचनाही पुराची तीव्रता वाढविण्यास सहायक ठरली. मराठवाड्याचा बहुतेक भाग बेसाल्ट खडकाने बनला आहे. काही भागांत भेगा पडल्यामुळे काही प्रमाणात पाणी झिरपते, परंतु बहुतेक हा खडक भरीव, अभंग असल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतो. ज्यामुळे जमिनीत खोलवर पाणी मुरण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी भूपृष्ठावर साचून राहते..लवकर आगमन, असमान पर्जन्यपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान प्रकल्पाचे कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. कैलास के. डाखोरे म्हणाले, की मराठवाड्यात २०२५ मध्ये मॉन्सूनपूर्व पावसाला मे च्या तिसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात (जून-जुलै) पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी (-१५ टक्के ते - ३० टक्के LPA) राहिले. सलग कोरडे दिवस आणि उशिरा पडणारा पाऊस यामुळे पेरणीची कामे आणि पिकांच्या सुरुवातीची वाढीवर परिणाम झाला. ऑगस्ट महिन्यात परिस्थितीत सुधारणा झाली..Flood Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात खरीप पुरता ‘पाण्यात’.१० ते २५ ऑगस्टदरम्यान झालेल्या मध्यम ते मुसळधार पावसामुळे मातीतील आर्द्रता आणि जलसाठ्यांमध्ये वाढ झाली. तरीही पर्जन्य वितरणात असमानता दिसून आली. काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस, तर काही ठिकाणी सामान्य पाऊस नोंद झाली गेली. सप्टेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात (२०- २८ सप्टेंबर) मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, तसेच शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबरमधील पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या १२० ते १८० टक्के इतके नोंदविले गेले..आवश्यक उपाययोजना ः-जल व्यवस्थापन आणि आपत्तीसाठीच्या पूर्वतयारीच्या पद्धतींत बदल.-संकट आल्यावर प्रतिक्रिया देण्याचा आणि पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करण्याचा जुना दृष्टिकोन बदलणे.-प्रशासन आणि स्थानिक लोकसमुदायाने हातात हात घालून काम करणे.-पायाभूत सुविधा आणि धोरणांमधील सरकारच्या भूमिकेची पूनर्कल्पना करणे.- नागरिकांना भविष्यातील संकटाविरुद्ध संरक्षणाची पहिली फळी म्हणून काम करण्यासाठी सक्षम करणे.-शासनाने आपत्कालीन मदतीच्या पलीकडे जाऊन संरचनात्मक आणि गैरसंरचनात्मक उपायांमध्ये दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक करणे.-दुष्काळ आणि अतिवृष्टी या दुहेरी धोक्यांचा सामना करण्यासाठी जल व्यवस्थापनाच्या भौतिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे..नैसर्गिक आपत्ती कशी आणि का येते, आल्यास प्रत्येकाची सामजिक जबाबदारी काय, शासनाची धोरणात्मक भूमिका काय असावी, यानिमित्ताने सर्वाधिक आघात होणाऱ्या शेतीच्या समस्यांना वाचा फुटावी, त्यावर उपाययोजना निघाव्यात यासाठी श्वेतपत्रिका तयार करण्याचा निर्णय घेतला.- मयांक गांधी, प्रमुख, ग्लोबल विकास ट्रस्ट, सिरसाळा, ता. परळी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.