Nashik News : वारी (ता. २५) सायंकाळनंतर मॉन्सूनोत्तर पावसाने सर्वदूर तडाखा दिला. सप्टेंबरअखेर अतिवृष्टीच्या तडाख्यात शेतकरी अडचणीत होता. दिवाळी सारखा सण शांततेत गेला. त्यातच अतिवृष्टीसह मुसळधार पावसामुळे १५ तालुक्यांमध्ये नुकसान वाढले असून २२ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. .यामध्ये द्राक्ष, खरीप व लेट खरीप कांदा, रब्बी कांदा रोपवाटिका, मका, सोयाबीन, भाजीपाला व पूर्वभागात वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान आहे. हातातोंडाशी आलेला घास दिवाळीच्या सणाला हिसकावून घेतला होता. त्यातच उरल्या सुरल्या पिकांची माती झाली.अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका येवला तालुक्याला सर्वदूर बसला आहे. अनेक ठिकाणी कापणी केलेली सोयाबीन व मका पावसात भिजला. लेट खरीप कांदा लागवडी व रब्बी कांदा रोपवाटिका पाण्याखाली गेल्याने दुसऱ्यांदा नुकसान वाट्याला आले आहे. .निफाड तालुक्यात सर्वदूर पावसाचे थैमान आहे. अगोदरच द्राक्ष उत्पादक तणावात होते. गोडीबहर छाटणी झाल्यानंतर घड निघण्यात अडचणी व संख्या कमी असताना नुकसान सोसवत नसल्याची स्थिती आहे. कापणी केलेल्या मका पाण्यावर तरंगत आहे. तर लासलगाव, नांदूर व विंचूर या भागात अतिवृष्टीमुळे लेट खरीप कांदा लागवडी व कांदा रोपवाटिका पाण्याखाली गेल्याने नुकसान सोसावत नसल्याची भीषण स्थिती आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित.नांदगाव मुसळधार पावसामुळे खरिपातील मका, लेट खरीप कांदा लागवडी व उन्हाळा कांदा रोपवाटिकांचे नुकसान आहे. यातच वेचणीला आलेला कापूस पूर्व भागात भिजल्याने नुकसान वाढते आहे.चांदवड तालुक्यात देखील पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे लेट खरीप कांदा व काढणीला आलेला खरीप कांद्याला फटका बसला. यासह पश्चिम पट्ट्यातील द्राक्ष उत्पादकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे..दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. यासह भाजीपाला, कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. सिन्नर तालुक्यातील अनेक भागांत पावसाने दाणादाण उडवली आहे. येथे कांदा, भाजीपाला व रब्बी कांदा रोपवाटिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.कसमादे भागातील देवळा तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. मका, सोयाबीनसह कांदा रोपवाटिकांचे मोठे नुकसान आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वच महसूल मंडलांत पावसाचा तडाखा आहे. त्यामुळे मका, वेचणीला आलेला कापूस व लेट खरीप कांदा लागवडीचे नुकसान पुन्हा वाढले आहे. .बागलाण तालुक्यात रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिका, भाजीपाला, मका पिकाचे नुकसान आहे. यासह आगाप द्राक्ष हंगामाची काढणी सुरू झाली आहे. मात्र ज्यांच्याकडे क्रॉपकव्हर नाही, त्यांच्या नुकसानीत वाढ शक्य आहे. कळवण तालुक्यात देखील उन्हाळ कांदा रोपवाटिका, मका व भाजीपाल्याचे नुकसान मोठे आहे..Rain Crop Damage : नाशिक विभागात ८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान .जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील सुरगाणा, पेठ, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत भात व नागली पिकाला फटका बसला. परिणामी भाताचे नुकसान झाल्याने एकरी उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील पावसाचा जोर दिसून आला येथेही वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाताचे पीक आडवे झाले. तर अनेक ठिकाणी कापणी केलेला भात पावसात तरंगत असल्याचे चित्र आहे..नुकसान दृष्टिक्षेपात :–मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे रब्बी कांदा रोपवाटिकांमध्ये रोपांची नुकसान–लेट खरीप कांदा लागवडी पाण्याखाली–पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागांमध्ये घड निघण्यावर मोठा परिणाम, जिरण्याची समस्या वाढली, घडांचे प्रमाण कमी–कापणी करून उघड्यावर ठेवलेली सोयाबीन अचानक आलेल्या पावसात भिजली–जनावरांसाठी ठेवलेल्या मका व बाजरीच्या चाऱ्याचे भिजून नुकसान–जिल्ह्याच्या पूर्व भागात कापूस पावसात भिजल्याने मोठा परिणामजिल्ह्यातील अतिवृष्टी अशी :महसूल मंडळ...पाऊस (मिमी)बागलाण...१०१.३ब्राह्मणगाव...७३.५मुंजवाड...७३.५कळवण...६५नवीबेज...६५.५कसबे वणी...६७.५लासलगाव...७२विंचूर...७२नांदुर...७२नायगाव...७९येवला...६६.५नगरसुल...६५.५अंदरसुल...६५.५पाटोदा...६५.५सावरगाव...६६.५जळगाव...६५.३अंगणगाव...६५.३चांदवड...८२.३देवळा...९२.३लोहनेर...८०.५खर्डे...६५उमराणे...७०.८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.