Moong Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Productivity : एका एकरात यंदा मूग निघाला सरासरी ७५ किलो

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यात यंदा पावसाने दिलेल्या खंडाचे खरिपातील पीक उत्पादनावर झालेले परिणाम दिसून येत आहेत. नगर जिल्ह्यात खरिपातील प्रमुख पीक असलेल्या मुलाच्या उत्पादनावर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला आहे.

कृषी विभागाला केलेल्या पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पादनाचा विचार केला तर मुगाचे सरासरी अवघे ७५ किलो उत्पादन निघाले आहे. त्यामुळे यांना मुगाच्या उत्पादनात सरासरी ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.

नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र असून ६ लाख ६९ हजार ३६२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र यंदा पावसाळ्यापासूनच पुरेसा पाऊस नाही. त्यात मध्यंतरीच्या काळात पावसाने दिलेल्या तुटीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून ८० टक्के खरिपाची पिके वाया गेली आहे. मागील सप्टेंबर महिन्यात शेवटच्या दहा दिवसांत बऱ्यापैकी अनेक भागात पाऊस झाला असला तरी त्याचा खरिपाला काहीही फायदा नाही.

नगर जिल्ह्यात मुगाचे सरासरी ४७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यांना उशिराने पाऊस झाला असला तरी मुगाच्या पेरणीने सरासरी ओलांडली. मात्र त्यानंतर सुमारे सव्वा महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाने खंड पाडला. ऐन शेंगा लागण्याच्या काळात पावसाने खंड पाडल्यामुळे मुगाच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातून हाती आलेल्या उत्पादनानुसार नगर जिल्ह्यात हेक्टरी सरासरी १७५ किलो उत्पादन निघाले आहे.

शेवगाव तालुक्यात बऱ्यापैकी मुगाचे उत्पादन निघाले असून संगमनेर आणि राहुरी तालुक्यात जवळपास पूर्णतः वाया गेलेला आहे. मुगाची गेल्यावर्षी राज्यात २ लाख ७७ हजार २९० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा १ लाख ७३ हजार ७२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाचे सर्वाधिक क्षेत्र नगर जिल्ह्यात असते. यंदा नगर, जालना, नाशिक, जळगाव, नांदेड जिल्ह्याशिवाय अन्य भागात मुगाचे क्षेत्र अल्प होते. राज्यातील बहुतांश भागात मुगाची उत्पादन मोठ्या प्रमाणात घेटले आहे.

मुगाची तालुकानिहाय उत्पादकता हेक्टरी
नगर : १५३ किलो ४३३ ग्रॅम
पारनेर : १९६ किलो ७४७ ग्रॅम
कर्जत : १९४ किलो ३३३ ग्रॅम
जामखेड : ११२ किलो ८०० ग्रॅम
शेवगाव : ४१५ किलो
पाथर्डी : ३०२ किलो २५० ग्रॅम
नेवासा : ३४० किलो
राहुरी : ३० किलो
संगमने : ६५ किलो

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT