Mung Rate : मुगाच्या किंमतीत वाढीचा कल

टीम ॲग्रोवन

या वर्षी खरीप मुगाचे उत्पादन (Mung Production)वाढेल, असा शासनाचा अंदाज आहे. 

Mung Dal | Agrowon

 गेल्या वर्षी मुगाचे उत्पादन १.४८ दशलक्ष टन होते. या वर्षी ते १८ टक्क्यांनी वाढून १.७५ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.

Mung Bean | Agrowon

यंदा देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये (Mung Market) आवक गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे.

Mung Market | Agrowon

ऑगस्ट -सप्टेंबर २०२१ मध्ये ती २५४ हजार टन होती. यंदा ती २०९ हजार टन झाली आहे. राजस्थान व उत्तर प्रदेशमधील आवक वाढली

Mung Market | Agrowon

आवक घटल्याने मुगाच्या किमती सप्टेंबर महिन्यात वाढत्या राहिल्या. ऑक्टोबरमध्येही आवक घटली तर किमती चढ्या राहतील.

Mung Farm | Agrowon

या सप्ताहात मूग व तूर वगळता सर्वच पिकांचे भाव घसरले. कापसाचे भाव ८.२ टक्क्यांनी घसरले, तर सोयाबीनमध्ये ४.१ टक्क्यांची घट झाली. 

Mung Crop | Agrowon

मूग गेल्या सप्ताहातील किमतीच्या पातळीवर होता, तर तुरीचे भाव २.५ टक्क्यांनी घसरले. कांदा व टोमॅटो यांच्या किमती आता वाढू लागल्या आहेत.

Mung | Agrowon

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) ऑगस्ट महिन्यात वाढत होते. या महिन्यात मात्र ते घसरत आहेत

Mung Dal | Agrowon
येथे क्लिक करा