Mung Crop : कमी पाऊस व किडींमुळे मूग उत्पादनात घट

Kharif Crop : खरीप हंगामातील मूग व उडीद या पिकांवर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी या रसशोषक किडी प्रादुर्भाव दिसतो.
Mung Crop
Mung CropAgrowon

jalgaon News : मूग उत्पादन यंदा कमाल शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड क्विंटल एवढेच हाती येत आहे. कमी पाऊस व किडींचा प्रकोप यामुळे उत्पादकता धोक्यात आली आहे. मुगाचे उत्पादन काही शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. पण खानदेशात पिकात शेंगा तोडणी, मळणीला सुरवात झाली आहे.

यंदा पाऊस उशिरा आला. ६ जुलैनंतर काही भागांत पावसाचे आगमन झाले. इतर भागात ९, १०, १३ जुलै या दरम्यान पाऊस झाला. यामुळे कडधान्यात उडीद, मुगाची पेरणी कमी झाली. खानदेशात ३० ते ३५ हजार हेक्टरवर मुगाची पेरणी अपेक्षित असते. जळगावात १६ ते १७ हजार हेक्टरवर मूग पेरणी केली जाते. परंतु यंदा मुगाची पेरणी खानदेशात ६० ते ६५ टक्केच झाली आहे.

Mung Crop
Moong Urad Sowing : मराठवाड्यात ज्वारी, मूग, उडदाची अपेक्षित पेरणी नाहीच

अनेकांनी तुषार सिंचनाच्या मदतीने पीक वाढविले. केळी पट्ट्यात जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात अनेक शेतकरी बेवडसाठी मुगाची पेरणी काळ्या कसदार, मध्यम जमिनीत करतात. या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाच्या मदतीने पीक वाढविले. यातच नंतर सतत पाऊस सुरू होता. किडींचा प्रकोप झाला. किडींची समस्या व प्रतिकूल स्थिती यामुळे उत्पादकता कमी झाली. सतत महिनाभर पाऊस सुरू होता. यामुळेही पिकाची हवी तशी वाढ, विकास होऊ शकला नाही. परिणामी, उत्पादन घटले आहे.

काही शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकले. परंतु कमाल शेतकऱ्यांना उत्पादन हवे तसे आलेले नाही. मुगाचे उत्पादन कमी असल्याने त्याची बाजारातील आवकही खानदेशात कमी आहे. दरवर्षी ऑगस्टच्या मध्यात आवकेत वाढ होते. परंतु यंदा काही बाजार समित्यांमध्येच आवक होत आहे. मुगाखालील क्षेत्र अनेकांनी तोडणी, मळणी करून रिकामे केले असून, त्यात कांदेबाग केळीची लागवड केली जाईल. त्याचे अवशेष तसेच शेतात शेतकरी गाडत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com