Fodder  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Fodder : कडब्याची गंजी रचण्याची एक कला! 

Article by Sominath Gholve : गावरान ज्वारीच्या कडबा म्हणजे जनावरांसाठी अतिशय कसदार आणि चवदार चारा आहे. दुभत्या जनावरांना प्राधान्याने दिला जातो.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Indian Agriculture : घरच्या ज्वारीची काढणी झाली. रखरख करणारे उन असल्याने लगेच कडबा वाळून गेला. अवकाळी कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं दुष्काळात पुन्हा चारा संकट नको म्हणून लगेच वैरणीची गंज घालून घेतली. गावरान ज्वारीच्या कडबा म्हणजे जनावरांसाठी अतिशय कसदार आणि चवदार चारा आहे. दुभत्या जनावरांना प्राधान्याने दिला जातो. कारण अतिशय दर्जेदार-कसदार असल्याने दुधात वाढ देखील होते.

पूर्वी आजोबा सांगत होते, घरची श्रीमंत ही घरी कडब्याच्या किती गंजी आहेत आणि दावणीला जनावरे किती? यावर ठरत होती. ज्याच्याकडे दावणीला जास्त जनावरे होती, त्यांच्या मुलांना मुली देण्यासाठी सतत विचारणा होत असे. पण आता चित्र तसे राहिले नाही. कडबा कमी मिळायला लागला आणि दावणीची जनावरे देखील कमी होऊ लागली. यांत्रिकीकरणाचे युग आले. हळूहळू पूर्व वैभव कमी होऊन यांत्रिकीकरणाचे वैभव -श्रीमंती पुढे येऊ लागली आहे. अर्थात हळूहळू ग्रामीण इलक्यातील आंनद यांत्रिकीकरणाच्या प्रेमाने हिरावून घेतला. 

फोटोत दिसणारी ही गंज मोठा भाऊ नवनाथ (बापू) याने रचलेली आहे. कडब्याची गंज रचणे ही एक कला--कौशल्य आहे. कोणालाही रचता येत नाही. तसेच गंज रचताना थोडीशी पेंडी इतके-तिकडे झाली तर गंज कलण्याची शक्यता जास्त असते. एकदा गंज रचली गेली की पुन्हा कितीही पाऊस येऊ द्या. वरचा एक थर वगळता गंजीत पाणी शिरून वैरण खराब होत नाही.  

गंज रचण्याचे एक शास्त्र आहे. ते शेतकऱ्यांना खूप चांगले अवगत आहे. गंजीची पुढची बाजू आणि मागची बाजू ही विणल्याप्रमाणे गुंफुन घ्यावी लागते. शेवटी सरडा काढून पाऊसाने पाणी गंजीत मुरणार नाही ही काळजी घेतली जाते. तसेच पाल्याचा थर टाकून ओल्या मातीचा चिखल करून डेपुन घ्यावी लागते. यामुळे गंजीत फारच वजन पडून मजबूतपणा येतो. एकदा गंज रचून झाली असता, त्यास मोकार सोडलेल्या जनावरांनी कितीही घासले तरी  पडत नाही की कलत नाही. त्यावरून किती मजबुतपणे गंजीची रचना असते याची कल्पना येते. एकदा गंज रचली असता दोन वर्ष कडब्याला काहीच होत नाही. कुजत देखील नाही, तसाच पूर्वीसारखा पांढरा आणि कसदार राहतो. शिवाय जुना कडबा जनावरे आवडीने खातात. 

गंज रचताना जागेची निवड, दिशा, उंची, लांबी याचा सारासार गणित ठरलेले असते. ते गंज रचणारा व्यक्ती आहे त्यास बरोबर कळते. अनुभव असतो. त्यातून कडबा शिल्लक राहत नाही की कमी देखील पडत नाही, इतके त्याचे गणित बरोबर असते. अलीकडे नगदी पिके घेण्यामुळे जास्तीचा असा वैरण निघणे कमी झाले आहे. त्यात ज्वारीची पेरणी कमी होऊ लागल्याने चारा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या गंजी रचल्या जात नाहीत काही विशिष्ट परिसरात आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांकडे असा कडबा मिळताना दिसून येतो. हळूहळू चार प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT