Amaravati ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Amarvati ZP : जिल्हा परिषदेचे सर्व विभाग होणार ‘स्मार्ट’

Smart ZP : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील १२ विभागांच्या कार्यालयांसह १४ पंचायत समित्यांमधील सर्व कार्यालये व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता दर शुक्रवारी श्रमदान करण्याचा उपक्रम सीईओ संजिता महापात्र यांनी सुरू केला आहे.

Team Agrowon

Amaravati News : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील १२ विभागांच्या कार्यालयांसह १४ पंचायत समित्यांमधील सर्व कार्यालये व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता दर शुक्रवारी श्रमदान करण्याचा उपक्रम सीईओ संजिता महापात्र यांनी सुरू केला आहे. जिल्हा परिषदेची सर्वच कार्यालये स्मार्ट करण्याची अंंमलबजावणी सुरू होणार आहे.

राज्यात मुख्यमंत्री यांनी १०० दिवसीय कृती आराखडा अंमलबजावणी १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत दशसूत्री अंमलबजावणी कार्यक्रम सर्वच शासकीय कार्यालयांना दिला आहे. या १०० दिवसीय कृती आराखड्यात सीईओंनी सर्व शासकीय कार्यालये नियमित स्वच्छ राहतील, यादृष्टीने प्रयत्न करणे तसेच दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्या अधिनस्त कार्यालयाची (अंतर्गत) सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता करणे, कार्यालय परिसराची स्वच्छता करणे तसेच कार्यालयातील दस्तऐवजांचे वर्गीकरण करून त्याची प्रचलित पद्धतीनुसार रंगवार वर्गवारी करून बस्ते तयार करणे व त्यास सुव्यवस्थित ठेवणे, कार्यालयातील सन्माननीय व्यक्तीच्या प्रतिमांची स्वच्छता करणे तसेच प्लॅस्टिक बंदी व दंड, कार्यालय परिसरात धूम्रपान करण्यास मनाई व दंड, थुंकण्यास मनाई व दंड आदींचे फलक लावण्यात यावेत.

आपले अधिनस्त कार्यालय नेटके, स्वच्छ व सुंदर असणे आवश्यक आहे. याकरिता आपण आपल्या स्तरावर कल्पकता वापरून कार्यालयाची सजावट करणे, अशा सूचना सीईओंनी पत्राद्वारे सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वच कार्यालये स्मार्ट करण्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

स्मार्ट कार्यालयांमध्ये परिसर व कार्यालयातील स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. याशिवाय सर्वच कार्यालयांतील दस्तऐवजांच्या वर्गीकरणावर अधिक भर दिला जात आहे. काही कार्यालयांनी दस्तऐवजांचे वर्गीकरण केले आहे. आणखी बरेच विभाग शिल्लक आहेत. ते येत्या काही दिवसांत होतील.
- संजिता महापात्र, सीईओ, जिल्हा परिषद, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Market: खानदेशातील पशुधन बाजारांत गजबज

Akola Heatwave: अकोल्यात उन्हाचा पारा वाढल्याने घामाच्या धारा

Water Shortage: फुलवडे येथील पाझर तलावाने गाठला तळ

Banana Farming Crisis: पार्डी शिवारात केळीची तीन हजार झाडे कापली

Women Farmer Story: महिला पशुपालकांनी शोधलाय इंधन स्वयंपूर्णतेचा मार्ग

SCROLL FOR NEXT