Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

Co-Operative Bank : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आदेशान्वये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी घातली आहे.
Amaravati DCC Bank
Amaravati DCC BankAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका आदेशान्वये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी घातली आहे. या प्रकरणी बॅंकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह १२ संचालकांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हा आदेश देण्यात आला.

नवीन उपविधी संदर्भात दोन महिन्यांत विभागीय सहनिबंधकांना निर्णय घेण्यास सुद्धा आदेशित करण्यात आले आहे. न्यायालयाचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांना धक्का मानला जात आहे. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकांनी एका आदेशान्वये बॅंकेच्या उपविधी दुरुस्ती प्रस्तावित केली होती. सत्ताधाऱ्यांकडून उपविधीमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या.

Amaravati DCC Bank
Solapur DCC Bank : संचालकांच्या मर्जीतील लोकांकडून कर्जवसुली आवश्‍यकच

त्यामध्ये सभेच्या गणपूर्तीची संख्या ११ वरून सात करणे, बँकेच्या सभासदांची शेअर किंमत एक हजारावरून १० हजारांपर्यंत वाढविणे, २० लाखांपर्यंतची खर्चमर्यादा एक कोटीपर्यंत करून त्याला मंजुरी देण्याचा अधिकार संचालक मंडळाऐवजी कार्यकारी समितीकडे देण्यात आला होता. सदर आदेशाविरुद्ध बॅंकेतील हरिभाऊ मोहोड व इतर १२ संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.

Amaravati DCC Bank
Dharshiv DCC Bank : दोन लाख शेतकऱ्यांना सभासद करून घेणार

सहकार मंत्र्यांनी उपविधी दुरुस्तीबाबतचा आदेश रद्द करून हे प्रकरण पुनश्च विभागीय सहनिबंधकांच्या कार्यालयाकडून उपविधी दुरुस्तीबाबत फेरचौकशी करावी, असे आदेशित केले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात बॅंकेचे दैनंदिन कामकाज जुन्या उपविधीप्रमाणे करण्याची मुभा दिली. मात्र कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्यावर बंदी घातली आहे.

बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली करून सभा घेण्यात आल्या. एकही सभा नियमाला अनुसरून झाली नाही, असा आमचा स्पष्ट आक्षेप आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या मनमानी कारभाराला न्यायालयाने अंकुश लावला आहे.
- बबलू देशमुख, संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पत्र मिळाले असून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. मात्र विरोधक सांगत आहेत तसे काहीच या आदेशात नाही. यापूर्वीच काही महत्त्वाचे निर्णय बॅंकेकडून घेण्यात आले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीस न्यायालयाकडून कुठलाही अडसर टाकण्यात आलेला नाही. यापुढे होणाऱ्या धोरणात्मक निर्णयांबाबत न्यायालयाचे हे आदेश आहेत. दोन महिन्यांत सुनावणी होणार आहे.
- अभिजित ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com