Amaravati ZP : कोटींची मान्यता, मात्र आचारसंहितेचा ब्रेक

ZP Work : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने बांधकाम विभागात धावपळ सुरू असून बांधकाम विभागाकडून ४८ कोटींच्या कामांना हिरवी झेंडी देण्यात आली आहे.
Amaravati ZP
Amaravati ZPAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने बांधकाम विभागात धावपळ सुरू असून बांधकाम विभागाकडून ४८ कोटींच्या कामांना हिरवी झेंडी देण्यात आली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गातील कामे या निधातून केली जाणार आहेत.

विशेष म्हणजे मान्यता देण्यात आली तरी आचारसंहितेमुळे निविदाप्रक्रिया मात्र खोळंबली आहे. त्यामुळे किमान महिनाभर तरी ही कामे थंडबस्त्यात पडणार आहेत.

Amaravati ZP
Amaravati Rain Update : ऑगस्टमध्ये अमरावतीत बरसला २१ दिवस पाऊस

जिल्हा परिषद बांधकाम विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण भागातील ‘क’वर्ग तीथक्षेत्र विकासाचे १०२ कामांसाठी जवळपास १२ कोटी ३०-५४ लेखाशीर्षाअंतर्गत ग्रामीण मार्गांच्या ८० कामांसाठी २१ कोटी ४५ लाख आणि ५०-५४ या लेखाशीर्षाअंतर्गत इतर जिल्हा मार्गांच्या ३७ कामांसाठी १४ कोटी १४ लाख, असा जवळपास ४७ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

Amaravati ZP
Amaravati DCC Bank : धोरणात्मक निर्णय घेण्याची अमरावती जिल्हा बँकेवर बंदी

प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला. त्यामुळे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

मात्र मंगळवारी (ता. १५) दुपारी आचारसंहिता लागू झाल्याने ४७ कोटींची कामे खोळंबणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत तरी ही कामे सुरू होण्याची शक्यता नाही.

बांधकाम विभागाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण मार्ग कामासाठी ४७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मात्र आचारसंहितेमुळे केवळ या कामांचे अंदाजपत्रक, दरपत्रक, तांत्रिक मान्यता ही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जाईल. आचारसंहितेनंतर निविदाप्रक्रिया राबविली जाईल.
- दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com