Hibiscus Flower  Agrowon
ॲग्रो विशेष

Natures And Agriculture : निसर्ग फुलला अजून काय हवं...

अमित गद्रे

Terrace Gardening : निसर्ग आणि बागेच्या आवडीमुळे गेल्या दहा वर्षात पुण्यातल्या हौशी बगीचाप्रेमींसोबत चांगला स्नेह निर्माण झालायं. आमच्या ग्रुपमधील कोणाला फुलझाडं, भाजीपाल्यांची रोपं, खतं हवी असली तर आम्ही एकमेकाला मदत करतो. काहीवेळा तर त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये नवीन कुंड्या, फुलझाडे रोपे लावून देखील देतो.

त्यामुळे महिन्यातून किमान तीन रविवारची सकाळ मी कोणच्या तरी बागेत सार्थकी लावलेली असते. याचा एक फायदा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार लोकांच्या ओळखी तर होतातच शिवायनवी माहितीही मिळते. महत्त्वाचं म्हणजे ३-४ तास निसर्गाच्या सानिध्यात घालवता येतात.

अशाच एका ओळखीतून सहा महिन्यांपूर्वी मला फडके आजोबांचा फोन आला. फडके आजोबा आमच्याच बिबवेवाडी परिसरात राहतात. त्यांना त्यांच्या बागेसाठी आमच्या गोशाळेतील गांडूळ खत, गोखुर खत, व्हर्मी वॉश हवं होतं. अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या एका सोसायटीत फडके आजोबांचा बंगला आहे. त्यांची वेळ घेऊन एका रविवारी सकाळी त्यांच्याकडे गेलो.

राष्ट्रीयकृत बँकेतून निवृत्त झालेले आणि फुलझाडे, फळझाडांची आवड असलेले ७५ वर्षांचे टूणटूणीत गृहस्थ म्हणजे फडके आजोबा. जुजबी बोलणं झाल्यानंतर आम्ही त्यांच्या टेरेवरच बांधलेल्या झोपाळ्यावर गप्पा मारत बसलो.

त्यांची आणि माझी वेव्हलेंथ जुळायचे एक कारण म्हणजे शेती आणि दापोली. दापोली जवळचं मुरुड हे त्यांच मूळ गाव. समुद्र किनारी नारळ, पोफळीच्या बागेत त्यांच घरही आहे. हे गाव मलाही माहीत असल्याने आमच्या गप्पा चांगल्या तासभर रंगल्या. त्यांनी त्यांचे बालपण, शिक्षण आणि नोकरी असा प्रवासच माझ्या समोर उभा केला.

आजोबा बरीच वर्षे भोर, मुळशी या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या बँकेच्या शाखांमध्ये कामानिमित्त राहिले. नोकरीच्या शेवटची पंधरा वर्षे ते पुण्यातील शाखेत होते. ग्रामीण भागात काम केल्याने त्यांना शेती आणि शेतकऱ्यांची चांगली जाण होती. शेती विकासासाठी त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांनी मदत केलेले शेतकरी आजही त्यांना पुण्यात भेटायला येतात.

निवृत्तीनंतर फडके आजोबांनी आपल्या बंगल्याच्या टेरेसवरच एक छोटीखानी बाग फुलवली आहे. वाढत्या वयामुळे घरचे लोक त्यांना आता गाडी चालवू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी माझ्याजवळ एक खंत व्यक्त केली की, अमित, मला रोज सकाळी स्वामी समर्थांच्या पूजेसाठी विविध प्रकारची फुले लागतात. पण मी रोपवाटिकेत जाऊ शकत नाही, जड वस्तू उचलू शकत नाही. मला तू वेगवेगळी जास्वंदी, गुलाब, सोनचाफ्याची कलमे आणून देशील का? आपण दोघे मिळून कुंडीत झाडे लावू.

पुढच्याच रविवारी सकाळी मी दहा रंगाच्या जास्वंदी आणि दोन सोनचाफा, चार देशी गुलाबांची रोपे घेऊन गेलो. आजोबा एकदम हौशी. त्यांनी तोपर्यंत कुंड्या आणून ठेवल्या होत्या. आम्ही दोघांनी मिळून दोन तासात सगळी कलमे लावली. त्यानंतर २-४ वेळा मी त्यांच्याकडे जाऊनही आलो.

मध्यंतरी एक महिना मला त्यांच्याकडे जाता आलं नाही. आज सकाळी त्यांचा फोन आला की, अमित येऊन जा. त्यांनी बोलावल्यामुळे मीही लगेच त्यांना भेटायला गेलो. आम्ही दोघांनी मिळून लावलेली जास्वंदी, गुलाब, सोनचाफा, दिन का राजा, सदाफुलीमुळे बाग बहरली होती. आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद आज काही वेगळाच होता.

मी त्यांना म्हणालो, आजोबा, लय भारी फुलली बाग. आजोबा म्हणाले, गेल्या चार महिन्यात माझं स्वप्न पूर्ण झालं. ही फुललेली बाग रोज आनंद देते. त्यापेक्षा जास्त म्हणजे देव आनंदी आहे. रोज मी त्यांना माझ्या बागेतील फुले अर्पण करतोय. निसर्ग फुलला आणि काय हवं. निसर्ग सेवा घडू द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT