Head of Orange Research Center Dr. Sanjay Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Management : संकटकाळी बागा वाचविण्याचे शास्त्रज्ञांनी सुचविले पर्याय

Dr. Sanjay Patil : परिस्थितीत धीर न सोडता बागा तोडण्याची चूक करू नये, आच्छादन, ठिबक सिंचन, फळांची विरळणी, बाष्पोत्सर्जकाचा वापर, मटका सिंचन आदींचा वापर केल्यास बागा जिवंत ठेवण्यास मदत मिळते, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत धीर न सोडता बागा तोडण्याची चूक करू नये, आच्छादन, ठिबक सिंचन, फळांची विरळणी, बाष्पोत्सर्जकाचा वापर, मटका सिंचन आदींचा वापर केल्यास बागा जिवंत ठेवण्यास मदत मिळते, असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिला.

कृषी विभाग आणि मोसंबी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त ‘बागा वाचवा अभियानांतर्गत’ पैठण तालुक्यातील अडुळ, रजापूर, दाभरुळ, आडगाव परिसरांतील बागांना मंगळवारी (ता. १६) भेट देऊन त्यांनी फळबाग उत्पादकांशी संवाद साधला त्या वेळी डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते.

या वेळी तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी वल्लभ भोसले, कृषी पर्यवेक्षक भाविता गुरव, अशोक पठाडे, कृषी सहायक राजू कोळगे, सोनी वाघ, नीलिमा मोरे, छाया अंभोरे,

मोसंबी बागायतदार भाऊसाहेब वाघ, गणेश बरबडे, कल्याण वाघ, शोभा चव्हाण, कैलास कुलट, विठ्ठल जावळे, विठ्ठल चिंतामणी आदींची उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, की आतापर्यंत काळजीपूर्वक बागा जतन केल्या आहेत. उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास कमी पाण्यावर देखील फळबागा वाचविण्यास हमखास मदत होते, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

Modern Fisheries: शेतीला दिली आधुनिक मस्त्यपालनाची जोड

Agro Industry: बचत गटातून मिळाल्या रोजगाराच्या नव्या वाटा

SCROLL FOR NEXT