Orange Export : निर्यातीसाठी अपेडा संत्रा बागायतदारांना देणार मार्गदर्शन

Orange Farmers : जागतिकस्तरावर फळ तसेच इतर पिकांच्या निर्यातीबाबत वेगवेगळी धोरण आहेत.
Orange
Orange Agrowon

Amaravati News : जागतिकस्तरावर फळ तसेच इतर पिकांच्या निर्यातीबाबत वेगवेगळी धोरण आहेत. त्यांचा अभ्यास करीत संत्रा उत्पादकांनी देखील त्या निकषांची पूर्तता करुन संत्रा फळांच्या निर्यातीसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठीचे तांत्रिक सहकार्य अपेडा व तत्सम यंत्रणांच्या माध्यमातून करण्याची ग्वाही अपेडाचे उपसरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे यांनी केले.

अपेडा, कृषी विभाग यांच्या संयुक्‍त सहकार्याने वरुड येथे आयोजित संत्रा निर्यात या विषयावरील खरेदीदार विक्रेते सभा तसेच प्रशिक्षणात ते बोलत होते. संत्रा गुणवत्ता सुधार तसेच संत्र्यांच्या थेट निर्यातीत शेतकरी उत्पादक कंपन्या, समूहांचा सहभाग वाढविणे असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. उद्‍घाटन सत्राला आनंद राऊत हे अध्यक्ष होते.

Orange
Orange Export Subsidy : संत्रा निर्यात अनुदानावर अखेर शासनाचे शिक्‍कामोर्तब

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, पणन मंडळाचे दिनेश डागा, नाबार्डचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र रहाटे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे डॉ. राजेंद्र वानखडे, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, प्रयोगशील शेतकरी रमेश जिचकार यांची या वेळी उपस्थिती होती.

अमरावती तसेच नागपूर जिल्ह्यातील १५० संत्रा उत्पादक तसेच शेतकरी कंपनी, समूहाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. प्रशांत वाघमारे यांनी या वेळी निर्याती संबंधाने असलेल्या अपेडाच्या योजना, निर्यातीची प्रक्रिया, सिट्रस नेटवरील नोंदणी, फार्मर कनेक्‍ट पोर्टल, अपेडाच्या आर्थिक सहायक विषयक योजना याबाबतची माहिती दिली.

Orange
Orange Export : संत्रा निर्यातीवर ५० टक्के अनुदानाला मान्यता; हंगाम संपल्यावर राज्य सरकारला आली जाग

राहुल सातपुते यांनी या वेळी सध्या निर्यात प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. त्याविषयीचे प्राथमिक आणि तांत्रिक ज्ञान अवगत केल्यास शेतकरी समूह, कंपन्यांना देखील निर्यात क्षेत्रात काम करता येणार आहे. स्थानिक आणि जागतीकस्तरावरील शेतीमालाच्या दराचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकऱ्यांनी निर्यातीबाबत पुढाकार घेतला पाहिजे.

यातून शेतकरी कंपन्या, समूहांना उत्पन्नाचा अतिरिक्‍त तसेच शाश्‍वत स्रोत उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत प्रणिता चौरे यांनी मेरा युवा भारत संकल्पना आणि पोर्टलवरील नोंदणी याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन एल. जी. श्रीराव यांनी केले. एस. बी. वरघट यांनी आभार मानले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com